Friday, October 7, 2011
Wednesday, October 5, 2011
यांचं फक्त राजकारण आणि जनसामान्यांच मरण.!
Posted by
bhushan
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या स्थानिक पक्षा मध्ये होणाऱ्या चढाओढीमध्ये सामान्य रिक्षावाल्याच मरण. यांचं फक्त राजकारण आणि जनसामान्यांच मरण. एवढंच जर पुळका येतो सामन्या जनतेचा मग तेव्हा कुठे हे पक्ष जेव्हा निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला होता , त्यामध्ये असे किती तरी सामान्य जन होते जे उपचारा अभावी तळमळत होते, वेदनांनी व्याकूळ झाले होते आणि कितेकानी तर प्राणही सोडले असतील तेव्हा नाही दाखवला यांनी कोणता सामान्य जनतेसाठी पुळका , नाहक निवडणुका आल्या जवळ कि लोकांच बिनपैशाच मनोरंजन करायचं एवढंच यांना ठाऊक .का नाही अण्णांच्या आंदोलना वेळी हे पक्ष रस्त्यावर उतरले तेव्हा काय जनतेच्या विषयाशी निगडीत प्रश्न नव्हता का ? पण नाही तिथे नाही जमणार यांना ते करायला . जे कुणी कुठल्याही पक्षात कार्यकर्ते ( जे कुठल्याही पदावर नाहीत. ) म्हणून कार्यरत असतात तीही सामान्य जनताच आहे...पण कुठल्यातरी पक्षाशी समंध असावेत म्हणून ते कार्यरत असतात आणि स्वताला कार्यकर्ते म्हणून संबोधतात !...
रिक्षावाले असतील परप्रांतीय किंवा आणखीन कुठले परंतु खरच जेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उठतात तेव्हा हे पक्ष मुग गिळून गप्पा का बसतात ?
याचं उत्तर तर कुणीही देऊ शकत नाही कारण प्रत्येकालाच राजकारणाच्या पटलावर आपली पोळी शेकून घ्यायची आहे ...सामान्य जनतेचा कुणीही मालक नाही..सर्व आहेत ते ....स्वार्थासाठी !
भूषण पाटील
रिक्षावाले असतील परप्रांतीय किंवा आणखीन कुठले परंतु खरच जेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उठतात तेव्हा हे पक्ष मुग गिळून गप्पा का बसतात ?
याचं उत्तर तर कुणीही देऊ शकत नाही कारण प्रत्येकालाच राजकारणाच्या पटलावर आपली पोळी शेकून घ्यायची आहे ...सामान्य जनतेचा कुणीही मालक नाही..सर्व आहेत ते ....स्वार्थासाठी !
भूषण पाटील
Monday, October 3, 2011
MorNiiNg MornIng GooD GoOd MorNinG !
Posted by
bhushan
MorNiiNg MornIng GooD GoOd MorNinG ! LetS gO BuddY On thE hIlL...sEE sUN sHInE, N HavE FuN On GoInG In yoUr Own TyminG !
BhUsHan PaTiL
NeVeR SaY Good ByE !
Posted by
bhushan
NeVeR SaY Good ByE !
Say OnLy ! ByE ! SweEt DrEaMs, TaKe CarE, GooD NiGhT
HopE So MorNinG wIlL Be BriNg NeW DireCtiON YoUr LifE
Say OnLy ! ByE ! SweEt DrEaMs, TaKe CarE, GooD NiGhT
HopE So MorNinG wIlL Be BriNg NeW DireCtiON YoUr LifE
Bhushan Patil
Sunday, October 2, 2011
गांधी या नावाला आणखीन जास्त प्रठीष्ठा प्राप्त झाली आहे
Posted by
bhushan
आज गांधी जयंती .......पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर भारत या खंडा मध्ये गांधी म्हणजे कॉंग्रेस या भ्रष्टाचारी पक्षाने ( सर्वच पक्ष भ्रष्ट आहेत ) त्यांचे नाव घेऊन राजकारण केलं आहे. आणि या देशात गांधीना मानणारा जसा एक गट आहे तसाच एक गट त्यांना विरोध करणारा हि आहे, अर्थातच सार्वजनिक मंचावरून तो विरोध न होता ग्रुप डिस्कशन मध्ये होतो हे कुणीही नाकारू शकत नाही . पण आज अण्णा हजारे मुळे मला अस वाटत कि गांधी या नावाला आणखीन जास्त प्रठीष्ठा प्राप्त झाली आहे ...कारण आजच्या पिढीवर किंवा जनमानसावर अण्णांचा जो प्रभाव आहे...त्या प्रभावाने गांधीना आणखीन मोठे केलं आहे. कारण अण्णांनी अण्णांनी अनेकदा आपल्या मंचावरून गांधींच्या विचारसरणीचा उदो उदो केला आहे त्यामुळे नकळतच गांधीनाही हे मोठेपण आपसूकच मिळून गेले आहे ....म्हणजे आज गांधीना विरोधी असणारेही किंचित का असेना गांधींच्या विरोधात बोलताना कचरतात कारण त्यांना अस वाटत कि आपण अण्णांनाच विरोध करत आहोत आणि हि भावना फार प्रखर्षाने जनमानसात रुजत आहे ....
म्हणूनच कुणीही कितीही टाहो फोडला तरी अण्णांमुळे गांधीजी हे नक्कीच मोठे झाले..अर्थात जे गांधीना विरोध करत होते त्यांच्या मनात ...
हो कि नाही ???
तुम्हाला काय वाटत ??
भूषण पाटील
Friday, September 30, 2011
सचिन तेंडुलकरला देण्यात येणार भारतरत्न अवार्ड आता लॉबीच्या भोवऱ्यात
Posted by
bhushan
सचिन तेंडूलकर, इंदुल्कर किंवा आणखी काही , तसेच अमिताभ बच्चन ( उर्फ बिग बी ) यांना भारतरत्न मिळावा म्हणून सध्या जंग जंग पछाडली जात आहे.
वरील सर्व महाशयांच अस काय योगदान आहे म्हणून यांना भारतरत्न द्यावा .१००च काय किंवा १००० सेन्चुरी मारल्या काय ? हा निकष आहे अवार्ड देण्याचा ? कि अमिताभ ने किती चांगलं काम करून लोकांच मनोरंजन केलं ? अर्थातच करोडो रुपये घेऊन ....अशा लोकांना भारतरत्न द्यावा काय ?
कि वैज्ञानिक , सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात भरघोस योगदान देऊन आपल्या देशाची मान नवे तर स्वतःच ज्ञान अखंड पाझरून त्यातून निर्माण होणाऱ्या शोध सदृश्य योशोगाथेला भारतरत्न दिला पाहिजे कि नवे इंदुल्कर , बच्चे बुच्चन यांना दिला जावा ....पण या देशाच हे दुर्दव्य आहे कि येथील विचारधारा विकास , आरोग्य , विज्ञान , ज्ञान , समाज सेवा , परोपकार यांना न जुमानता ती एका प्रसिद्धीच्या मागे जाते म्हणूनच आज फक्त तेंडूलकर, अमिताभ किंवा एखादा मयत किंवा जिवंत राजकारणी याच्या पलीकडे कोणालाही नाव दिसत नाही ....परंतु या देशात अशी कितीतरी नाव आहेत जी या भारतरात्नापेक्षा
श्रेष्ठ आहेत ....
भूषण पाटील
वरील सर्व महाशयांच अस काय योगदान आहे म्हणून यांना भारतरत्न द्यावा .१००च काय किंवा १००० सेन्चुरी मारल्या काय ? हा निकष आहे अवार्ड देण्याचा ? कि अमिताभ ने किती चांगलं काम करून लोकांच मनोरंजन केलं ? अर्थातच करोडो रुपये घेऊन ....अशा लोकांना भारतरत्न द्यावा काय ?
कि वैज्ञानिक , सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात भरघोस योगदान देऊन आपल्या देशाची मान नवे तर स्वतःच ज्ञान अखंड पाझरून त्यातून निर्माण होणाऱ्या शोध सदृश्य योशोगाथेला भारतरत्न दिला पाहिजे कि नवे इंदुल्कर , बच्चे बुच्चन यांना दिला जावा ....पण या देशाच हे दुर्दव्य आहे कि येथील विचारधारा विकास , आरोग्य , विज्ञान , ज्ञान , समाज सेवा , परोपकार यांना न जुमानता ती एका प्रसिद्धीच्या मागे जाते म्हणूनच आज फक्त तेंडूलकर, अमिताभ किंवा एखादा मयत किंवा जिवंत राजकारणी याच्या पलीकडे कोणालाही नाव दिसत नाही ....परंतु या देशात अशी कितीतरी नाव आहेत जी या भारतरात्नापेक्षा
श्रेष्ठ आहेत ....
भूषण पाटील
Saturday, September 17, 2011
One day picnic spots in & around Mumbai & Thane with travel arrangements
Posted by
bhushan
Location | No of Kms / hrs from Mumbai | Hotel Name | Packages |
Alibaug | 120 kms / 3 hours | Hotel Big Splash | Click Here |
Hotel Sahyadri | Click Here | ||
Dahanu | 120 kms / 3.5 hrs | Hotel Beachside | Click Here |
Igatpuri | 120 kms / 3 hours | Manas Resorts | Click Here |
Karjat | 85 kms / 2.5 hours | Satya Health Farm | Click Here |
Prakruti farms | Click Here | ||
Piccadilly Country Club & Resort | Click Here | ||
Karnala | 50 kms / 1 hour | Rishi Resorts | Click Here |
Lonavala | 100 kms / 2 hours | Cosmos Resorts (water park) | Click Here |
Kumar Resorts (water park) | Click Here | ||
Sky Blue Resort | Click Here | ||
Hotel La Revival | Click Here | ||
Sweet Heart Resort | Click Here | ||
Nagothane | 100 kms / 2.5 hours | Kamath Residency | Click Here |
Nature Trails | 100 kms / 3 hours | Sajan Nature Club | Click Here |
100 kms / 3 hours | Garden Resort Vikramgad | Click Here | |
90 kms / 2 hours | Durshet Forest Lodge (Khopoli) | Click Here | |
Panvel | 40 kms / 1 hour | Raigad Resorts | Click Here |
Panvel | 40 kms / 1 hour | Zus Family Resort | Click Here |
Thane District | 100 kms / 3 hours | Harshgiri Lake Resort (Shahapur) & Water park | Click Here |
100 kms / 3 hours | Green paradise (Arnala beach Virar) | Click Here | |
125 kms / 3 hours | Silient Resort (Palghar Manor) | Click Here | |
100 kms / 3 hours | Great Escape (Virar) | Click Here | |
100 kms / 3 hours | Srushti Farms (Vashind) Agro Tourism | Click Here | |
3 kms from Mumbai-Nasik highway | Dirghayu Farms Agri Resort Tal. Shahapur, Dist. Thane |
ऑफिस मधील राजकारण
Posted by
bhushan
व्यक्ती तशा वल्ली या तत्वा नुसार आपण जिथे जातो तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती पहावयास मिळतात .काही व्यक्तींना आपण मुळातच नापसंत करतो तर काहीना त्यांच्या कर्मामुळे . मग अशा वातावरणात वावरताना आपली तारांबळ उडते काय कराव हे सुचत नाही. मग चालू होत्ये आरोप प्रत्यारोपांची फुलझडी ....कारण समोर असणारी व्यक्ती स्वताला स्वयंघोषित सिनिअर समजत असते .स्वतच्या नोकरी खातर मग चालू... होतो जाच सहन करण्याचा पर्याय कारण दुसरे पर्याय खुलेच नसतात .अशी परिस्थिती जिथे निर्माण होईल तिथे एकाच मार्ग खुला राहतो मौन. परंतु एका लिमिटच्या बाहेर
जर वातावरण जावयास सुरुवात झाली तर कुठल्याही व्यक्तीने त्या परिस्थितीला मोठ्या धाडसाने समोर गेलं पाहिजे ..आणि स्वताला सुखरूप बाहेर काढलं पाहिजे ....तर तुमचा कुठे निभाव लागण शक्य आहे नाहीतर प्रत्येक ठिकाणी हि तुम्हाला त्रास देणारी माणसे देवाने तुमच्या समोर वाढू ठेवलेली असतील आणि त्यांना कस सामोरे जायचं हे तुमच्या मनोबलावर अवलंबून असेल .
भूषण पाटील
मेरे लिये वह एक चाहत भरी झीन्दगी है !
Posted by
bhushan
मेरे लिये वह एक चाहत भरी झीन्दगी है ! जिसे काफी कारीबसे चाहा है ! ज्यो मेरे पोहोच के बाहर है ! लेकीन यकीन है ! उसे हासील करना एक मक्सद है ! होसला बुलंद है ! विश्वास कि एक चिंगारी जगनी है ! फिर मंजिल करीब है
bhushan patil
घटना साधारण ६ महिन्यानपूर्वीची .....
Posted by
bhushan
घटना साधारण ६ महिन्यानपूर्वीची .....
मी सायन स्टेशन चढून घरी जात असताना वर प्लाट फॉर्म वर एक जोडपं उभं होत. त्या व्यक्तीच्या हातात एक तान्ह मुल होत ,
आणि शेजारी एका कोपऱ्यात त्या तान्हुल्याची माई उभी होती, आणि त्या व्यक्तीने मला अडवून माझ्याकडे बाळासाठी दुधाच्या पैशासाठी मागणी केली , मी कसलाही विचार न करत १० ची नोट त्याच्या हातावर ठेऊन निघून गेलो ....( मला १० रुपये दिल्याचे उलट समाधान आहे. ) पण असेही फार असतात जे लहान बाळांचा उपयोग आपल्या उदरनिर्वाहा साठी करतात . हे लिहिण्याचा तात्पर्य एवदाच कि तुमच्या बाबतीतही असा घडत असेलच ना ?
तुम्हाला काय वाटत ?
bhushan patil
थुई थुई मोर नाचू लागताच , सरीवर सरी पडू लागतात ,
Posted by
bhushan
थुई थुई मोर नाचू लागताच , सरीवर सरी पडू लागतात ,
त्यांचं आगमनच जणू , रंग बहार असतं,
ओलाव्याच रान असतं, नभी इंद्रधनू खुलेआम असतं ,
मन हि बेभान असतं , चिंब भिजलेली ती काया पाहून
थिजून थिजून गोठून गेलेलं असतं
... म्हणूनच का हे नेहमी चिरतरुण प्रेम असतं ?
म्हणूनच का हे नेहमी चिरतरुण प्रेम असतं ?
भूषण पाटील
जेव्हा जेव्हा अपयश पदरी येत असत,
Posted by
bhushan
जेव्हा जेव्हा अपयश पदरी येत असत, निराशा घेर करून निर्व्याज बुद्धीपटलावर आघात करून बुद्धीची प्रणाली खंडित करत असते , आजूबाजूने लायकी नसलेले अकार्यशं महानुभाव आपली मतांतर समक्ष त्यांच्या उत्कटतेतून प्रकट करत असतात, तेव्हा अशा वेळेस जगण्याची धडपड चालू होते त्या धडपडीत जगताना हे विसरलं जात जी धडपड आपण जगण्यासाठी करतो तिच्यातून आपण मूळी जगतच नाही तर चक्क जगताना धडपडीच आयुष्य जगतो , म्हणूनच आयुष्य हे जगण्यासाठी आहे , जगण्यासाठी आयुष्य नाही
भूषण पाटील
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची,
Posted by
bhushan
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची, आणि या तीनही क्वालिटीज तुमच्याकडे आहेत..आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होणार नाही म्हणून तुम्ही कायम प्रयत्नशील असता.
कायम निरंतर रहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील .....
भूषण र. पाटील
गणितात मिळालेल्या १०० %...
Posted by
bhushan
गणितात मिळालेल्या १०० % मार्कांपेक्षा, मिळालेल्या मार्कस मध्ये किती % गणित तुम्हाला उमगले हे जस अपेक्षित आहे तसच
आपण आपल्या आयुष्यात किती जगलो या पेक्षा कस जगलो हे महत्वाचे आहे नाही का ?
भूषण पाटील
तसं मला टाईप करण्याचा फार कंटाळा येतो ,
Posted by
bhushan
तसं मला टाईप करण्याचा फार कंटाळा येतो , तरीही मित्रदिनाचे औचित्य साधून मी तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करणार आहे. (अनुभव सत्य घटनेवर आधारित )
असेच कॉलेज फ्रेंड्स एका मित्राच्या बडेला सहल काढतात , त्यात ८ ते ९ मुली आणि साधारण त्याच प्रमाणात मुलं सुद्धा असतात , मुलींना कार ची सोय केली जाते ,
सहल निसर्ग सानिध्यात ठरविली जाते . मुलं मुलींच्या मागाउन येतात ( त्यात त्यांनी त्यांच्या ग्रुप बाहेरची मुलही बोलावलेली असतात ज्यांना त्या मुली फारशा ओळखत नसतात .) मुलींना कसलीच खबर नसते कि मुलांनी काय प्लान केला आहे , पण त्यांच्या दृष्ठीने ते त्यांचे खास मित्र असतात , मुलांनी त्यंच्या बरोबर ड्रिंक्स ( दारू ) कॅरी केललं असत, आणि मुलींना याची भनक सुद्धा नसते एवढ्या पुरत मर्यादित न राहता ती मुलं मुलीन समोर ड्रिंक्स करतात , तर मुलींना अंधारात ( मैत्रीच्या नावाखाली ) ठेऊन अशा निर्जन ठिकाणी त्या मुलांनी केलेले हे कृत्य मित्र या नात्याने रास्त आहे का ?
यालाच मैत्री म्हणाव का ?
( तिथे एखादी अप्रिय घटना हि घडू शकली असती , म्हणूनच मैत्री दिनाचे औचित्य साधून मी माझ्या मित्र आणि मैत्रिणींना असा आवाहन करीन कि तुमच्या मध्ये असलेले नाते हि, हे एवढे स्वच्छ आणि निकोप हवे कि तिथे कोणत्याही प्रकारच्या फसवेगिरी, लुच्चागिरी किंवा खोटेपणाला थारा नसावा जे तुमचे आयुष्य उद्वस्त करेल.)
सूचना : - ड्रिंक्स करणं हे त्यांच्या आनंदाचा व मजेचा भाग असू शकतो परंतु कोणालाही ( मुलींना ) अंधारात ठेऊन त्यांच्या समक्ष हे कृत्य करणं माझ्या दृष्ठीने चुकीचे होते.
तुम्हा सर्वाना
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचा
भूषण पाटील
असेच कॉलेज फ्रेंड्स एका मित्राच्या बडेला सहल काढतात , त्यात ८ ते ९ मुली आणि साधारण त्याच प्रमाणात मुलं सुद्धा असतात , मुलींना कार ची सोय केली जाते ,
सहल निसर्ग सानिध्यात ठरविली जाते . मुलं मुलींच्या मागाउन येतात ( त्यात त्यांनी त्यांच्या ग्रुप बाहेरची मुलही बोलावलेली असतात ज्यांना त्या मुली फारशा ओळखत नसतात .) मुलींना कसलीच खबर नसते कि मुलांनी काय प्लान केला आहे , पण त्यांच्या दृष्ठीने ते त्यांचे खास मित्र असतात , मुलांनी त्यंच्या बरोबर ड्रिंक्स ( दारू ) कॅरी केललं असत, आणि मुलींना याची भनक सुद्धा नसते एवढ्या पुरत मर्यादित न राहता ती मुलं मुलीन समोर ड्रिंक्स करतात , तर मुलींना अंधारात ( मैत्रीच्या नावाखाली ) ठेऊन अशा निर्जन ठिकाणी त्या मुलांनी केलेले हे कृत्य मित्र या नात्याने रास्त आहे का ?
यालाच मैत्री म्हणाव का ?
( तिथे एखादी अप्रिय घटना हि घडू शकली असती , म्हणूनच मैत्री दिनाचे औचित्य साधून मी माझ्या मित्र आणि मैत्रिणींना असा आवाहन करीन कि तुमच्या मध्ये असलेले नाते हि, हे एवढे स्वच्छ आणि निकोप हवे कि तिथे कोणत्याही प्रकारच्या फसवेगिरी, लुच्चागिरी किंवा खोटेपणाला थारा नसावा जे तुमचे आयुष्य उद्वस्त करेल.)
सूचना : - ड्रिंक्स करणं हे त्यांच्या आनंदाचा व मजेचा भाग असू शकतो परंतु कोणालाही ( मुलींना ) अंधारात ठेऊन त्यांच्या समक्ष हे कृत्य करणं माझ्या दृष्ठीने चुकीचे होते.
तुम्हा सर्वाना
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचा
भूषण पाटील
मुलगी एका मित्राला :- मला आपला बॉस एस एम एस पाठवतो आणि डेट साठी यायला सांगतो.
Posted by
bhushan
मुलगी एका मित्राला :- मला आपला बॉस एस एम एस पाठवतो आणि डेट साठी यायला सांगतो , मुद्दाम काम काढून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो...आणि शेरेवजा संभाषण करतो ,
तुमच्या बाबतीत असं एखाद्या ऑफिस मध्ये घडल तर तुम्ही काय कराल ?
मुलगा आणि मुलगी दोघंही आपली मत मांडू शकता .
मला वाटतं प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी
Posted by
bhushan
मला वाटतं प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी कि लोकपाल बिलावर त्यांची काय प्रतिक्रिया ? आणि कुठलीही लीपापोती न करता १०० % आपला पाठींबा जाहीर करावा, तोही ! प्रेस कॉन्फरन्स घेऊन, कारण हा प्रश्न आता लोकांचा राहिला नसून तो आता लोका...ंच...्या भावनांचा, इच्छांचा आणि उद्रेकाचा एक हार ( राजकारण्यांसाठी काटेरी हार ) झाला आहे, आणि हा हार जो कोणी राजनेता प्रथम गळ्यात घालेल तोच खरा लोकांच्या विश्वासास पात्र आणि गळ्यातला ताईत होईल. कारण तमाम युवा वर्ग आज राजकारण्यांच्या पाठी उभा आहे आणि हीच संधी आहे कि त्यांनी लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे दुसऱ्यांना आमचाच मुद्दा म्हणून बोलायला संधी मिळणार नाही.
तुमचा
भूषण पाटील
तुमचा
भूषण पाटील
आज कुणी कोन्ग्रेस वाला नाही, शिवसेनेवाला नाही ,
Posted by
bhushan
आज कुणी कोन्ग्रेस वाला नाही, शिवसेनेवाला नाही , कुणी मनसेवाला नाही, कुणी राष्ट्रवादी वाला नाही, कुणी बीजेपीवाला नाही .....
आज फक्त मी अण्णा आहे " अण्णा "
आज अण्णा एक आवाज आहे, अण्णा एक वादळ आहे .
राजकारण्यांना वाटणार भय आहे, आणि जनतेला वाटणारं आधारवड आहे.
अण्णा एक सदीची क्रांती आहे, सरकारची ती वंचना आहे .
आज फक्त मी अण्णा आहे " अण्णा " आणि फक्त अण्णा !
भूषण पाटील
मित्रांनो मी तुम्हाला "अण्णा" या शब्दाचा अर्थ सांगणार आहे,
Posted by
bhushan
मित्रांनो मी तुम्हाला "अण्णा" या शब्दाचा अर्थ सांगणार आहे,
जस आपल्या कडे म्हटलं जात "अन्न हे पूर्ण ब्रम्ह" म्हणजेच अन्न हेच ब्रम्ह आहे, म्हणजे एक वेळेचे अन्न नशिबी नसलेल्या आपल्या देशातील ८० % लोकांना जस "अन्न" हे साक्षात ब्रम्हसारख आहे जणूकाही त्यांनी देवच पहिला, अशा देशात भ्रष्टाचाराने हैराण झालेल्या ९९.९९ % ( राजकारणी , नोकरशाह आणि भांडवलदार सोडून ) जनतेत "अण्णा " हे सुद्धा "अन्न" आहेत म्हणजेच "अण्णा हे पूर्ण ब्रम्ह" अन्न जस तुमचा भुकेचा अग्नी शांत करतो तसेच अण्णा हे भ्रष्टाचारा मुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढत आहे आणि मला विश्वास आहे ते हे काम लवकरच तडीस नेणार आहेत .
"अन्न हे पूर्ण ब्रम्ह ! अण्णा हे पूर्ण ब्रम्ह "
तुमचा
भूषण पाटील
आजचं तरुण नेतृत्वा बद्दल बोलायचं झाल्यास तो राजकारणाकडे एक धंदा म्हणूनच पाहत आहे.
Posted by
bhushan
अण्णांचा त्याग, विचारसरणी, साध राहणीमान, देशाप्रती असलेली समर्पणाची भावना , समाजासाठी असलेली ओढ , अशा एक न अनेकविध वैशिष्ठ्य आहेत अण्णांकडे आणि हीच त्यांची बलस्थाने पण आहेत,
आणि याच्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलत तर तुमच्या लक्षात येईल कि तरुणाई याच्या कडे नुसतच फ्याशन म्हणून पाहत नाही तर,त्यांना कळून चुकलं आहे कि तमाम राजकारण्यांनी जनतेचा त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला आहे. कारण पहा आज म...हाराष्ट्रात सुधा ( कॉंग्रेसला आपण बाजूला ठेऊ ) कुठलाही पक्ष किंवा राजकारणी अण्णांच्या बाजूने किंवा जनलोकपाल बिलाच्या बाजूने बोलला नाही, कारण सरळ आहे उद्या जर हे बिल पास झाले तर हि सर्व मंडळी या मध्ये भरडली जाणार आहेत जी जनतेची हिमायती आहे अस आज पर्यंत ते म्हणत आलेत. आणि हि सर्व तरुण मंडळी हे पाहत आहेत म्हणून त्यांनाही कळून चुकले आहे कि फक्त मतांचं राजकारण करणारीच नेतेमंडळी इथे आहेत, म्हणून तो अण्णांच्यापाठी खंबीरपणे उभा आहे .
आणि आजचं तरुण नेतृत्वा बद्दल बोलायचं झाल्यास तो राजकारणाकडे एक धंदा म्हणूनच पाहत आहे.
आणि हे सर्व वातावरण जन लोकपाल बिल पास होई प्रयांतच राहणार आहे आणि पुन्हा हा तरुण आणि जनता सुधा त्याच राजकारणी पुढाऱ्याना मतदान करणार आहे कारण आपल्या कडे दुसरा विकल्प नाही ....आहे का ?
भूषण पाटील
माझ्या कमेंट मध्ये मी लिहिलं आहे कि "मी सविस्तर लिहित नाही
Posted by
bhushan
माझ्या कमेंट मध्ये मी लिहिलं आहे कि "मी सविस्तर लिहित नाही" पण आता लिहितो, मुळात म्हणजे गो रा (काळा) खैरनार म्हणजे कुणी साधुसंत नाही किंवा असलेच ते त्यांच्या कुटुंबासाठी असतील. आता मुद्दा हा कि अण्णांचं शिक्षण किती झालं ? म्हणजे त्यांना अस म्हणायचं आहे का ? कि अनेक विद्यापीठांची मानद कोणाकडे आहे आणि ती व्यक्ती केसांपासून नखांपर्यंत जर भ्रष्टाचारामध्ये जर लुप्त असेल तर अशी व्यक्ती खैरनारांना जास्त ...चालणार आहे आणि त्यांचा असा गोड गैर समज झालेला दिसत आहे कि ते काहीही म्हंटले तरी त्यांना कोणीही काही म्हणणार नाही ..... एक असा स्वच्छ चारित्र्याचा माणूस जर भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे आणि त्याच्या विरुद्ध कुठे जाऊन गैरसमज पसरवायचा यासाठी त्यानाही कोणी विकत तर घेतला नाही न ?
तुमच्या मध्ये जर ताकत असेल तर करावीत अशी आंदोलन नाहीतर मुग गिळून रीटायरमेंट च आयुष्य गपगुमान जगावं का उगीच जगाला उपदेश द्यायला तुमची शक्ती खर्ची करावी...
भूषण पाटील
इतिहास साक्षीदार आहे ...
Posted by
bhushan
इतिहास साक्षीदार आहे ...रक्तरंजित क्रांती शिवाय कुठल्याही देशात क्रांती होत नाही, म्हणूनच लोकांच्या जीवाची, त्यांच्या भुकेची काळजी नसलेल्या पाषाण हृदयी सरकारला आणि तमाम राजकारण्यांना थाऱ्यावर आणण्यासाठी कोण, कुठे, केव्हा , कसा एखादा भगत सिंग किंवा राजगुरू तयार होईल किंवा त्याही पलीकडे
जाऊन एखादा सतवंत सिंग व बेअंत सिंग ( इंद्रा गांधींचे मारेकरी ) सुद्धा असेल सांगता येत नाही एव्हडा रोष या सरकार विरुद्ध जनते मध्ये खदखदत आहे. बस ठिणगी पडायची आहे , नाहीतर पुढे काय होईल या सत्तेवर बसलेल्या लोकांचं देवास ठाऊक ? .
सरकारने या सर्व गोष्ठी रोखण्यासाठी लवकरात लवकर पाऊले उचलली पाहिजेत , कारण जर लोक रस्तावर उतरली तर तुम्ही त्यांना गोळ्या घालणार का ?
bhushan patil
बिनधास्त टीव्ही च्यानल वर एक कार्यक्रम चालवला जातो.
Posted by
bhushan
बिनधास्त टीव्ही च्यानल वर एक कार्यक्रम चालवला जातो. त्यामध्ये मुली किंवा स्त्रिया या आपला जोडीदार आपल्याशी किती एकनिष्ठ आहे हे पाहण्यासाठी टीव्ही च्या माध्यमातून चाचपण्याचा प्रयंत्न करतात . परंतु बहुतांशी वेळा त्यांच्या हाती निराशा लागते. मग अस का होत ? म्हणजे एखादी सुंदर, बोल्ड मुलगी दिसली कि आपली गर्ल फ्रेंड असताना आपण तिच्या कडे का जाव ? याचा विचार तो न करता सरळ सरळ त्या मुलीशी फ्लर्ट करतो ......म्हणजेच जी मुलगी त्या मुलाबरोबर भावी आयुष्याची स्वप्न बघत असते . तिला समोर फक्त आणि फक्त जबर धक्काच बसतो..अर्थातच यात त्यांचाही तेवढाच हात असतो कारण तिने किंवा त्याने केलेली निवड हि विश्वास, भरवसा, सामंजस्य आणि प्रेम यावर केलेली नसते तर ती निवड सौंदर्य, पैसा , निवळ आकर्षण , फसवणूक, फ्याशन , जिद्द या निकषान वर केलेली असते ...अस मला वाटत ......तुमचा काय ? तुम्हालाही असाच वाटत का ? कि माझ्या विरुद्ध काही और ....जरूर नोंदवा ...
तुमचा
भूषण पाटील
प्रचंड प्रमाणात रांगा लाऊन लोक आपली देवावर असणारी श्रद्धा दाखवतात.
Posted by
bhushan
प्रचंड प्रमाणात रांगा लाऊन लोक आपली देवावर असणारी श्रद्धा दाखवतात , परंतु त्यांना अस का वाटत कि एक विशिष्ठच देव ( गणपती ) आपल्या नवसाला पावतो. ज्या देव्हाऱ्यात वर्षानुवर्षे आपली कुलदैवत असतात , "श्री गणेशा " सह , ती का या रांगा लाऊन दर्शन घेणाऱ्या देवा पेक्षा वेगळी असतात ? कि फक्त ती एक सहज प्रवृत्ती आहे , कि १०० लोक तिकडे चाललेत म्हणून मीही जातो, त्यामुळेच या लांबच लांब रांगा लागतात, (कि तो एक मनोरंजन आणि उत्सुकतेचा भाग असतो ) आज मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव विविध अंगांनी साजरा केला जाईल , प्रचंड गर्दी होईल म्हणून जी कुटुंब आपल्या लहानग्यांना घेऊन जातील, कच्च्या बच्यांना घेऊन जातील त्यांनी काळजी घ्या .
सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
भूषण पाटील
भ्रष्टाचार नष्ट होऊदे म्हणून साकड घातलं आहे . how silly ?
Posted by
bhushan
माहित काय करत होती ? ) दिवसरात्र मंडपात जागून आणि मंडपाच्या बाहेर रांगा लाऊन आपली देवावरची श्रद्धा दाखवेल आणि एखादा न्यूज चानल वाल्याने तोंडासमोर माईक धरला तर म्हणेल आम्ही देवाला समाजातला
भ्रष्टाचार नष्ट होऊदे म्हणून साकड घातलं आहे . how silly ? या १२ दिवसात करोडो लोक मुंबईच्या रस्त्यावर उतरतील ( दिवस आणि रात्र ). पण तीच जनता, तोच समाज
भ्रष्टाचारा विरुद्ध जेव्हा आंदोलन चालत तेव्हा काही हजारोंच्या घरातच जाते , आणि तरीही आपण म्हणतो ,
"मेरा भारत देश महान"
भूषण पाटील
डॉक्टर म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी साक्षात देवच ?
Posted by
bhushan
डॉक्टर म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी साक्षात देवच , आणि हे डॉक्टर आज त्यांच्यासाठी रक्षक नाहीतर भक्षकच झाले आहेत .....आज शिक्षणाचाही " आईचा घो झाला आहे " म्हणजेच पैसे देऊन डोनेशन वर मेडीकललाही सहज प्रवेश घेता येतो अर्थातच ज्यांच...्या बापजाद्यांकडे पैसा असतो तेच लोक जातात ( लायकी नसतानाही ) आणि काय तर म्हणे आम्ही डॉक्टर ? तुम्हाला जर मानवी जीवनाच मूल्य कळत नसेल तर तुमचं डॉक्टर असणे हे ओसामा बिन लादेन असण्या सारखच आहे नव्हे का ? कारण त्यालाही मानवी जीवनाच मूल्य हे माहित नव्हत ते काय असतं हे आणि हे सर्व जगाला माहित आहे. तुम्ही तर चक्क सफेद कपडे, नव्हे कफन ओढून हे काम करता आणि म्हणे आमचा संप आहे आमच्या एका डॉक्टर सहकाऱ्याला मारहाण झाली .संप जरूर व्हावा पण तो कोणाच्याही जीवाशी खेळून नाही . तुम्ही डॉक्टर आहात यम नाही. तुमचं काम जीवन देणं आहे घेणं नाही. म्हणून तुम्हाला संपाचा विचार करताना काम बंद आंदोलन करण्यापेक्षा दुसरा पर्याय शोधला पाहिजे. कारण उद्या डॉक्टरांवर हमला झाला म्हणून फाशीचा कायदा जरी झाला तरी तुम्हाला असे हमले होणार नाहीत अस जर वाटत असेल तर ते साफ चुकीच आहे ......कारण एखाद्या परिवारातील व्यक्ती डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे जर दगावली तर तिथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांना कायद्याच काही देणं घेणं नसेल आणि तुमच्यावर हमला केला जाईल .....म्हणून जर तुम्ही डॉक्टर म्हणून व्रत अंगिकारले असेल तर तुम्हाला तुमच्या रुग्णाकडे एक बकरा म्हणून न पाहता त्याच्याशी तुमचं सौहार्दाच नात निर्माण झालं पाहिजे तुमच्या वर त्याचा संपूर्ण विश्वास असला पाहिजे. तरच हे हल्ले होणार नाहीत नाहीतर तुम्हाला फाशीचा कायदाही वाचू शकणार नाही .....
भूषण पाटील
भूषण पाटील
Subscribe to:
Posts (Atom)