Saturday, September 17, 2011

आजचं तरुण नेतृत्वा बद्दल बोलायचं झाल्यास तो राजकारणाकडे एक धंदा म्हणूनच पाहत आहे.

अण्णांचा त्याग, विचारसरणी, साध राहणीमान, देशाप्रती असलेली समर्पणाची भावना , समाजासाठी असलेली ओढ , अशा एक न अनेकविध वैशिष्ठ्य आहेत अण्णांकडे आणि हीच त्यांची बलस्थाने पण आहेत,
आणि याच्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलत तर तुमच्या लक्षात येईल कि तरुणाई याच्या कडे नुसतच फ्याशन म्हणून पाहत नाही तर,त्यांना कळून चुकलं आहे कि तमाम राजकारण्यांनी जनतेचा त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला आहे. कारण पहा आज म...हाराष्ट्रात सुधा ( कॉंग्रेसला आपण बाजूला ठेऊ ) कुठलाही पक्ष किंवा राजकारणी अण्णांच्या बाजूने किंवा जनलोकपाल बिलाच्या बाजूने बोलला नाही, कारण सरळ आहे उद्या जर हे बिल पास झाले तर हि सर्व मंडळी या मध्ये भरडली जाणार आहेत जी जनतेची हिमायती आहे अस आज पर्यंत ते म्हणत आलेत. आणि हि सर्व तरुण मंडळी हे पाहत आहेत म्हणून त्यांनाही कळून चुकले आहे कि फक्त मतांचं राजकारण करणारीच नेतेमंडळी इथे आहेत, म्हणून तो अण्णांच्यापाठी खंबीरपणे उभा आहे .
आणि आजचं तरुण नेतृत्वा बद्दल बोलायचं झाल्यास तो राजकारणाकडे एक धंदा म्हणूनच पाहत आहे.
आणि हे सर्व वातावरण जन लोकपाल बिल पास होई प्रयांतच राहणार आहे आणि पुन्हा हा तरुण आणि जनता सुधा त्याच राजकारणी पुढाऱ्याना मतदान करणार आहे कारण आपल्या कडे दुसरा विकल्प नाही ....आहे का ?
भूषण पाटील

No comments:

Post a Comment