प्रचंड प्रमाणात रांगा लाऊन लोक आपली देवावर असणारी श्रद्धा दाखवतात , परंतु त्यांना अस का वाटत कि एक विशिष्ठच देव ( गणपती ) आपल्या नवसाला पावतो. ज्या देव्हाऱ्यात वर्षानुवर्षे आपली कुलदैवत असतात , "श्री गणेशा " सह , ती का या रांगा लाऊन दर्शन घेणाऱ्या देवा पेक्षा वेगळी असतात ? कि फक्त ती एक सहज प्रवृत्ती आहे , कि १०० लोक तिकडे चाललेत म्हणून मीही जातो, त्यामुळेच या लांबच लांब रांगा लागतात, (कि तो एक मनोरंजन आणि उत्सुकतेचा भाग असतो ) आज मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव विविध अंगांनी साजरा केला जाईल , प्रचंड गर्दी होईल म्हणून जी कुटुंब आपल्या लहानग्यांना घेऊन जातील, कच्च्या बच्यांना घेऊन जातील त्यांनी काळजी घ्या .
सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
भूषण पाटील
No comments:
Post a Comment