डॉक्टर म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी साक्षात देवच , आणि हे डॉक्टर आज त्यांच्यासाठी रक्षक नाहीतर भक्षकच झाले आहेत .....आज शिक्षणाचाही " आईचा घो झाला आहे " म्हणजेच पैसे देऊन डोनेशन वर मेडीकललाही सहज प्रवेश घेता येतो अर्थातच ज्यांच...्या बापजाद्यांकडे पैसा असतो तेच लोक जातात ( लायकी नसतानाही ) आणि काय तर म्हणे आम्ही डॉक्टर ? तुम्हाला जर मानवी जीवनाच मूल्य कळत नसेल तर तुमचं डॉक्टर असणे हे ओसामा बिन लादेन असण्या सारखच आहे नव्हे का ? कारण त्यालाही मानवी जीवनाच मूल्य हे माहित नव्हत ते काय असतं हे आणि हे सर्व जगाला माहित आहे. तुम्ही तर चक्क सफेद कपडे, नव्हे कफन ओढून हे काम करता आणि म्हणे आमचा संप आहे आमच्या एका डॉक्टर सहकाऱ्याला मारहाण झाली .संप जरूर व्हावा पण तो कोणाच्याही जीवाशी खेळून नाही . तुम्ही डॉक्टर आहात यम नाही. तुमचं काम जीवन देणं आहे घेणं नाही. म्हणून तुम्हाला संपाचा विचार करताना काम बंद आंदोलन करण्यापेक्षा दुसरा पर्याय शोधला पाहिजे. कारण उद्या डॉक्टरांवर हमला झाला म्हणून फाशीचा कायदा जरी झाला तरी तुम्हाला असे हमले होणार नाहीत अस जर वाटत असेल तर ते साफ चुकीच आहे ......कारण एखाद्या परिवारातील व्यक्ती डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे जर दगावली तर तिथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांना कायद्याच काही देणं घेणं नसेल आणि तुमच्यावर हमला केला जाईल .....म्हणून जर तुम्ही डॉक्टर म्हणून व्रत अंगिकारले असेल तर तुम्हाला तुमच्या रुग्णाकडे एक बकरा म्हणून न पाहता त्याच्याशी तुमचं सौहार्दाच नात निर्माण झालं पाहिजे तुमच्या वर त्याचा संपूर्ण विश्वास असला पाहिजे. तरच हे हल्ले होणार नाहीत नाहीतर तुम्हाला फाशीचा कायदाही वाचू शकणार नाही .....
भूषण पाटील
भूषण पाटील
No comments:
Post a Comment