महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या स्थानिक पक्षा मध्ये होणाऱ्या चढाओढीमध्ये सामान्य रिक्षावाल्याच मरण. यांचं फक्त राजकारण आणि जनसामान्यांच मरण. एवढंच जर पुळका येतो सामन्या जनतेचा मग तेव्हा कुठे हे पक्ष जेव्हा निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला होता , त्यामध्ये असे किती तरी सामान्य जन होते जे उपचारा अभावी तळमळत होते, वेदनांनी व्याकूळ झाले होते आणि कितेकानी तर प्राणही सोडले असतील तेव्हा नाही दाखवला यांनी कोणता सामान्य जनतेसाठी पुळका , नाहक निवडणुका आल्या जवळ कि लोकांच बिनपैशाच मनोरंजन करायचं एवढंच यांना ठाऊक .का नाही अण्णांच्या आंदोलना वेळी हे पक्ष रस्त्यावर उतरले तेव्हा काय जनतेच्या विषयाशी निगडीत प्रश्न नव्हता का ? पण नाही तिथे नाही जमणार यांना ते करायला . जे कुणी कुठल्याही पक्षात कार्यकर्ते ( जे कुठल्याही पदावर नाहीत. ) म्हणून कार्यरत असतात तीही सामान्य जनताच आहे...पण कुठल्यातरी पक्षाशी समंध असावेत म्हणून ते कार्यरत असतात आणि स्वताला कार्यकर्ते म्हणून संबोधतात !...
रिक्षावाले असतील परप्रांतीय किंवा आणखीन कुठले परंतु खरच जेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उठतात तेव्हा हे पक्ष मुग गिळून गप्पा का बसतात ?
याचं उत्तर तर कुणीही देऊ शकत नाही कारण प्रत्येकालाच राजकारणाच्या पटलावर आपली पोळी शेकून घ्यायची आहे ...सामान्य जनतेचा कुणीही मालक नाही..सर्व आहेत ते ....स्वार्थासाठी !
भूषण पाटील

No comments:
Post a Comment