व्यक्ती तशा वल्ली या तत्वा नुसार आपण जिथे जातो तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती पहावयास मिळतात .काही व्यक्तींना आपण मुळातच नापसंत करतो तर काहीना त्यांच्या कर्मामुळे . मग अशा वातावरणात वावरताना आपली तारांबळ उडते काय कराव हे सुचत नाही. मग चालू होत्ये आरोप प्रत्यारोपांची फुलझडी ....कारण समोर असणारी व्यक्ती स्वताला स्वयंघोषित सिनिअर समजत असते .स्वतच्या नोकरी खातर मग चालू... होतो जाच सहन करण्याचा पर्याय कारण दुसरे पर्याय खुलेच नसतात .अशी परिस्थिती जिथे निर्माण होईल तिथे एकाच मार्ग खुला राहतो मौन. परंतु एका लिमिटच्या बाहेर
जर वातावरण जावयास सुरुवात झाली तर कुठल्याही व्यक्तीने त्या परिस्थितीला मोठ्या धाडसाने समोर गेलं पाहिजे ..आणि स्वताला सुखरूप बाहेर काढलं पाहिजे ....तर तुमचा कुठे निभाव लागण शक्य आहे नाहीतर प्रत्येक ठिकाणी हि तुम्हाला त्रास देणारी माणसे देवाने तुमच्या समोर वाढू ठेवलेली असतील आणि त्यांना कस सामोरे जायचं हे तुमच्या मनोबलावर अवलंबून असेल .
भूषण पाटील
No comments:
Post a Comment