आज गांधी जयंती .......पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर भारत या खंडा मध्ये गांधी म्हणजे कॉंग्रेस या भ्रष्टाचारी पक्षाने ( सर्वच पक्ष भ्रष्ट आहेत ) त्यांचे नाव घेऊन राजकारण केलं आहे. आणि या देशात गांधीना मानणारा जसा एक गट आहे तसाच एक गट त्यांना विरोध करणारा हि आहे, अर्थातच सार्वजनिक मंचावरून तो विरोध न होता ग्रुप डिस्कशन मध्ये होतो हे कुणीही नाकारू शकत नाही . पण आज अण्णा हजारे मुळे मला अस वाटत कि गांधी या नावाला आणखीन जास्त प्रठीष्ठा प्राप्त झाली आहे ...कारण आजच्या पिढीवर किंवा जनमानसावर अण्णांचा जो प्रभाव आहे...त्या प्रभावाने गांधीना आणखीन मोठे केलं आहे. कारण अण्णांनी अण्णांनी अनेकदा आपल्या मंचावरून गांधींच्या विचारसरणीचा उदो उदो केला आहे त्यामुळे नकळतच गांधीनाही हे मोठेपण आपसूकच मिळून गेले आहे ....म्हणजे आज गांधीना विरोधी असणारेही किंचित का असेना गांधींच्या विरोधात बोलताना कचरतात कारण त्यांना अस वाटत कि आपण अण्णांनाच विरोध करत आहोत आणि हि भावना फार प्रखर्षाने जनमानसात रुजत आहे ....
म्हणूनच कुणीही कितीही टाहो फोडला तरी अण्णांमुळे गांधीजी हे नक्कीच मोठे झाले..अर्थात जे गांधीना विरोध करत होते त्यांच्या मनात ...
हो कि नाही ???
तुम्हाला काय वाटत ??
भूषण पाटील
No comments:
Post a Comment