Saturday, May 19, 2012

आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीने आपण स्वताला सधन समजतो.

आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीने आपण स्वताला सधन समजतो. सधन या अर्थाने म्हणावयाचे आहे मला कि ज्यांच्या कडे जडजवाहीर, स्थावर मालमत्ता , वडिलोपार्जित धनसंपत्ती असा संचय असतो.

परंतु अशाच एखाद्या घरातील जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते आणि कोणताही उपाय साथ देत नाही तेव्हा हे माझ्याच नशिबी का अस म्हणायची पाळी त्याच्यावर येते अर्थातच अशा वेळेस काय सधन आणि काय निर्धन सर्वांची अवस्था हि अतिशय केविलवाणी होते. परंतु अशा परिस्थितीला सामोरे जाताना त्या कुटुंबातील मंडळीनी अतिशय धर्याने सामोरे गेले पाहिजे आणि समोरच्या व्याधीग्रस्त माणसाला धीर दिला पाहिजे

तर नक्कीच त्याची माणसिक कणखरता हि त्याच्या व्याधी वर विजय मिळवून जाईल ....


No comments:

Post a Comment