Sunday, May 13, 2012

( माझ्या आईला मी शब्दबद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि तिच्या मनात असलेली माझ्या विषयीची तळमळ...आणि मी ना....)

काही काही वेळेस आपल्या आयुष्यात अत्यंत भाऊक होण्याचे म्हणा किंवा स्वताचे अंतर्मन तपासून पाहण्याचे दिवस येतात....आणि "आई" म्हंटल कि या जगातला सर्वात जिव्हाळ्याचा आणि भाऊक " विषय" म्हणणार नाही मी त्याला पण .. ते एक अस नात असत ज्याला अंत नसतो, त्यामध्ये कोणताही दिखावा नसतो, कमीपणा नसतो.. आई या शब्दातच अमृताचा गोडवा आणि अमरत्व आहे..पण ते अमृत आणि अमरत्व आम्हाला उमगतच नाही...तिथे असणाऱ्या ओलाव्यापुढे अनंत कोटी कोटी सूर्यांची दाहकता हि शीतल चंदना सारखी आहे.....त्याचा गाभाच असा आहे कि....त्याचा थांग कुणालाही लागू शकत नाही आणि शकणारही नाही...आईच्या अंतर्मनाची व्याप्ती हि अमर्याद आहे ...तिला तोड नाही...जन्म जसा एकदाच मिळतो तशी आई हि पण एकदाच मिळते ....पण एका जन्मातून दुसरा जन्म मिळतो अस मी ऐकलं आहे .परंतु आई हि एकदाच मिळते...
म्हणून मित्रांनो माझ्या दृष्ठीने माझ्या जन्मा पेक्षाहि श्रेष्ठ हि माझी "आई" आहे .....म्हणून तुमच्या हृदयाच्या कप्प्यात तुमच्या आईसाठी एक कप्पा जरूर ठेवा आणि त्यातच तुमच-माझं सौख्य सामावलेले आहे...
कारण तिथला निवास हा साक्षात "आई स्वरूपी देवीस आपण देत असतो"
माझी आई
भूषण पाटील

1 comment:

  1. खूपच छान मित्रा, आई आपल्यासाठी सर्वकाही आहे, आईमुळे आपण या जगात आलो, नमन करतो मी सर्व आईंना... खरंतर शब्द कमी आहेत बोलायला...

    ReplyDelete