पूर्वी घरात दोन, तीन किंवा चार किंवा त्याही पेक्षा जास्त मुल असत . काळ बदलत गेला. लाकांचे राहणीमान बदलले. घरातील टीवी जाऊन त्याची जागा संगणकाने घेतली. असो आजच हे थोडसं असलेले म्हणा किंवा नसलेले म्हणा शहाणपण लिहिण्याच कारण जरा वेगळच आहे.
मुलं मोठी होतात .मग त्यांचे संसार होतात. प्रपंचाला सुरुवात होते मग घरात पाळणा हलतो .एका नवीन आयुष्याला सुरुवात होते. मग आई वडिलांना घरातील एखादा कोपरा धरावा लागतो.त्यांच्या कडे लक्ष्य देण्यास फारसा कोणाला वेळ नसतो....पण घरातील किंवा घर सोडून गेलेल्या मुली मात्र आपल्या आई वडिलांसाठी मुलांपेक्षा जास्त जागरूक आणि संवेदनशील असतात. याच पण पण मुलींची येथे एक बाजू मांडताना मला त्यांची दुसरी बाजूही समोर आणली पाहिजे आणि ती म्हणजे जस मी वर म्हटलं कि मुली या जास्त संवेदनशील असतात आई वडिलां प्रती ..त्यांना खूप काळजी असते त्यांची परंतु त्याच मुली आपल्या सासू सासऱ्यांना नेमक त्या विरुद्ध वागणूक का देतात ? लग्न होऊनही मुली आपल्या पालकांचा सांभाळ करतात हि खूपच चांगली गोष्ठ आहे. परंतु लग्न होऊन जेव्हा त्या सासरी जातात तेव्हा तिथे मात्र घर विघटन होईल या वर भर देतात .
मुलानाही वेळ नसतो आपल्या पालकांना थोडी विचारपूस करून त्यांची हलोहावाल माहिती करून घेण्याची कारण तेव्हा तो आपल्या माता पित्यांना विसरलेला असतो. मग अशा वेळेस दूर सासरी असलेल्या मुली म्हणा किंवा इतरत्र असलेल्या मुली म्हणा आपल्या पालकांना सांभाळण्यास कशाचीही कसूर करत नाहीत. आणि त्या त्यांच्या वृद्धापकाळात काठी बनतात.
"अशा सर्व मुलीना माझा अगदी कोपरापासून कुर्निसात " Soooooo keep it up girls !
भूषण पाटील

No comments:
Post a Comment