Saturday, May 19, 2012

मैत्रीचे धागे केव्हा विणले जातात हे कळतच नाही

मैत्रीचे धागे केव्हा विणले जातात हे कळतच नाही . माझ्या ऑफिस मध्ये काही दिवसांपूर्वी एक जुनिअर ग्राफिक डिझायनर आला.आमचे बंध घट्ट केव्हा जमले हे कळलंच नाही .परंतु काही कारणास्तव त्याला कंपनीतून निश्काशित करण्यात आले आणि शेवटच्या दिवशी घरी परतताना त्याचे दाटून आलेले अंतकरण मला भांबावून गेले.
असाच एक अनुभव जसा कि मित्रांचे आपल्यावर असलेले अतूट प्रेम म्हणा किंवा त्यांचे तुमच्या प्रती असलेले आदर म्हणा
मी माझ्या डेस्क वर काम करीत असताना माझा एक कलीग मित्र माझ्या बाजूला आला आणि म्हणाला कि माझे रीजाइन हे तुझ्या अगोदर झाले पाहिजे ....मला हे एकूण shock बसला मी विचारलं असं कारे तर त्याच उत्तर एकूण मला फार खेद जाणवला. तो म्हणाला कि मी गेलो तुझ्या अगोदर तर कुणाला काही फरक पडणार नाही आणि तू गेलास तर मी एक दिवसही इथे काढू शकणार नाही ....
यालाच म्हणतात मैत्रीचे अतूट बंधन जे मनाने बांधले जाते त्यामध्ये आपुलकी आणि प्रेमाचा ओलावा असतो जरुरी नाही कि ते फक्त मुलगा आणि मुलीचं नात असायला हव ...तुमच्यात एवढी ताकत असायला हवी कि तुम्ही दगडाला पाझर फोडाल....असो. मी अगोदर गेलो काय आणि तो अगोदर गेला काय ? पण जे दिवस आम्ही सोबत काढले त्यातून जे नात निर्माण झाल ते काही कमी नाही.
माझ्या अशा तमाम मित्रांना
माझा शीरसाष्टांग दंडवत

तुमचा
भूषण

No comments:

Post a Comment