या शीर्षकाची निवड मी मुद्दामच केली कारण अवती भोवती होत असलेला बदल हा मी शब्दांच्या कोंदणात पकडण्याचा प्रयत्न केला आहे...लहान मुलांची होणारी कुचंबना हि त्यांच्याच दृष्ठीने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आई , मम्मा , मां, मदर काय असतं हे अजून तरी मला माहित नाही कारण मी सध्या आई च्या पोटात आराम फर्मावत आहे...बाहेरून येणारा आजोबांचा आवाज, बाबांची आजीकडून होत असलेली कान उघडणी आणि तीही माझ्या साठी काय गम्मत न! मी तर अजून बाहेरच जगहि पाहिलं नाही नि आतापासूनच माझे लाड चालू झाले..आणि तो दिवस लवकरच जवळ आला..माझ्या जन्माचा ! नऊ महिने बाहेरच जग जस माझ्या स्वागताला आतुर झालं होत किंबहुना मी त्याच्या कैकपट बाहेरच जग पाहायला आतुर होतो ....माझे इवलेशे डोके, अगदी लुसलुशीत, मऊशार शरीर सतत आईच्या पोटावर आदळत होतो. तिच्या उदरातून मिळणाऱ्या उर्जेवर मी जगत होतो.
आणि आणि तो दिवस जवळ आला. माझी बाहेर येण्याची धडपड हि परमोच्च शिखर गाठू लागली. माझा श्वास हा दुपटीने आत बाहेर होऊ लागला..झालं माझ्या आईला प्रसुतीच्या वेदना जणू लागल्या .तिला भयंकर त्रास होत आहे याची मला जाणीव होत होती पण ती हे सर्व आणि सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होती. अचानक आईला जीवघेणा त्रास होऊ लागला परिस्थिती अतिशय नाजूक झाली ....तशाच अवस्थेत आईला जवळच्याच सुश्रुषा इस्पितळात हलवण्यात आलं. आईची परिथिती अतिशय बिकट होत होती प्रत्येक मिनिटागणिक . कोणालाही काय कराव हे सुचत नव्हतं..धावाधाव चालू झाली .डॉक्टर, नर्स ,वाडबोय यांची त्रेधातिरपीट उडाली. आता तर प्रत्येक सेकांदागनिक आईची ताबेत खालाऊ लागली..डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी वौड मध्ये हलवलं...आणि तिथेच माझा जन्म झाला पण पण पण.....हे जग मी जिच्यामुळे पाहू शकलो ती माझी जननी, माझी माय, माझी आई हे जग सोडून निघून गेली......

( भूषण पाटील )
No comments:
Post a Comment