Thursday, September 2, 2010

झुंज

एक झुंज दे वाद्ळाशी
श्रधांजलीची वाट पाहू नकोस
उघड्या डोळयानीं सत्य बघ
भिंतीच्या चौकटीत स्वतःला सजवू नकोस.

हे असेच चालत आले
आणी चालणार
तुझ्या येण्याच्या प्रत्येक मार्गावर
ते त्यांचे निशाण ठेवणार
घोड्याची नाल ते घराला बांधणार
आणी,
खिळा म्हणून तुला भिंतीत जागा देणार.

हळूहळू तुला सगळ समजेल
हळव करून टाकण्याइतपत तुला उमजेल
तलवारीची ती दुधारी शक्ती
तुला म्यानात अडकवेल
आणी,अनुक्रमाणीकेत तुला
परीशिष्ट म्हणून स्थान मिळेल.

काही वेळेला तुला खुपस करावस वाटेल
बदल घडवावासा वाटेल
तुला जुन्या इतिहासाची कात्रण
प्रत्येक समाधीत अडकवतील
आणी, नावासाहीत् तुला
त्या वास्तुत सडाव लागेल.

जे नको ते ऐकाव लागेल
डोळे बंद होईपर्यंत पहाव लागेल
तुला तुझ्या बुद्धीची किमंत सागतांना
बधीरत्वाच्या व्याख्येत मांडतील
आणी, वेड्यांच्या इस्पितळात
तुझा मनाने सन्मान करतील.

तुझे विचार कदाचित सुविचार ठरवतील
तुला समोर पाहताच मनमोकळ हसतील
सर्व कोनांतून तुझे मोजमाप करून
तुला एकाकी पाडतील
आणी,तुझ्यासमोरच
तुला खोट ठरवतील.

तू किती वेळ धैर्य टीकवशील
कितीदा तू स्वतःला सावरशील
तूला तुझ्या लाचर दुनियेत पाहतांना
माघारी तुझ्या हसतील
आणी,
येणाऱ्या सर्व मार्गांवर काटे पसरवतील. तुझ्याच शब्दांवर ताशेरे ओढतील
जगण्याचे नियम तुला समजवतील
एखादा नियम मोडला की
कोणत्यातरी कोपर्‍यात तुला लपवतील
आणी,
तुलाच शोधण्याचा बहाणा करतील.

No comments:

Post a Comment