Sunday, September 5, 2010

अंगाई

गाऊन अंगाई कधी आई ने शांत मला झोपवून दिल,
नको मी एकटी कधी म्हणून पदरात तिने लपेटून दिल..

मायेने हात तिचा सतत माझ्या डोक्यावर ठेवला,
नको जगात हरवून जायला म्हणून सतत मला बिलगुण ठेवल

तिच्या त्या प्रेमळ आवाजात सप्त सुरांचा मेळ आहे,
ऐकून हाक तिच्या तोंडून कर्ण माझे तृप्त आहे..

आई च्या काळजीत, काळीज माझ अलगद झुलते आहे,
तो प्रेमळ झोका मला स्वर्गाचा दर्शन करुन देत आहे..!

साभार आणि कवियेत्री
रुची

.....................................................................................................................................................................

माझी माय....

माझी माय असते गावाकडे
डोळे तीचे सगळे माझ्याकडे
एकदाही नाही विचारल तुला
येतीस का ग इकडे

सकाळी पोळ्या करता करता
कधी चमक भरायची कमरेत
तेव्हा एकदाही नाही बाम
लावू वाटला ग तुला

एकदा जत्रेला जायचं होतं मला
तेव्हा भात उतरताना टार्कन
आलेला फोड पाहून यात्रेतन
चिमटाही नाही आणू वाटला ग तुला

माझ्या चुका बापा पासून
नेहमी लपवत तू होतीस
तेव्हा एकदाही नाही वाटलं
बाप ओरडेल का ग तुला

आज आहे मी त्या वळणावर
ज्या वळणावर तू होतीस
तेव्हा तुझे ते बोल आठवतात
"बाबा माय हाय तर सगळ हाय
बाकी कुनाचं कोन न्हाय "
कुनाचं कोन न्हाय...............

.....................................................................................................................................................................

मी आणि ताई भांड भांड भांडायचो.........

मी आणि ताई भांड भांड भांडायचो
नुसतेच फटके नाही ,एक्मेंकाना बोच्कारायचो

सकाळी उठल्या पासून भांडण सुरु व्हायचे
एकच सायकल कुणी न्यायची ethun युद्ध व्हायचे

चोकलेट कोणाला जास्त,संत्र कोणाच मोठ यावर पण आम्ही खूप भांडायचो
भांडा भांडीत एकमेकांच्या वस्तू तोडायचो

मारून बोच्कारून ताई मुसुमुसु रडायची आणि मी हसायचो
आणि मग बाबान कडून धपाधप मार खायचो......

...........................आणि अचानक बाबा गेले

तूच सायकल ने ,मला जवळ जायचं आहे अस आम्ही दोघ हि म्हणायचो
किती हि उशीर झाला तरी एकमेकांची जेवायसाठी वाट पाहायचो

संत्र,चोकलेट खायची आमची परिस्थती नाही राहिली
पण पेपरमिंट ची गोळी सुद्धा ताईने माझ्या शिवाय नाही खाल्ली

ताईच लग्न ठरल ,ताईची वरात आली
मी ताईच्या गळ्यात व ताई माझ्या गळ्यात पडून ढसा ढसा रडलो

बाबा असताना हि आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो,फक्त भांडायचो
.......बाबा जाण्याने एक फरक पडला
त्यांची उणीव कमी करायचं दोघांनी हि प्रयत्न केला.......

.....................................................................................................................................................................

"माय"

कधीमधी उगाचच वाटत राहतं,
आपणही आभाळ व्हायला हवं होतं..
मायच्या फाटक्या नशीबावर,
फाटकं का होईना..
पांघरुण व्हायला हवं होतं.

पापणी होऊन अलगद,
तिच्या आसवांना झेलायला हवं होतं..
तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवुन का होईना ..
भरपुर पाझरायला हवं होतं.

तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर,
जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं..
राहुन राहुन मन खंतावतंय,
एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन..
मनसोक्त रडायला हवं होतं.

.....................................................................................................................................................................

एका आईची अंतयात्रा..

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
कीनारी पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही
- तुझी प्रेमस्वरुप आई

.....................................................................................................................................................................

"लक्षात नसलेला बाप"

आपल्या सांगा विचारे कोण?
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥ध्रु॥
आई तुझी मांगल्य घराचे
पण बाप,पप्पा अस्तित्व हो तुमचे
कळते तुम्हा दु:ख आईचे
पण आईस धीर असते बापाचे
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥१॥
आई मुलाला जन्म जेव्हा देते
सर्वथा कौतुक तीचेच होते
हॉस्पिटल बाहेर धावपळ ज्याची होते
त्या व्यस्त बापाची दखल कोण घेते
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥२॥
म्हणे जिजाईने शिवाजी घडवला
पण शहाजीने जिवाचा रान केला
राम जेव्हा वनवासी गेला
पुत्र शोकाने दशरथ हो मेला
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥३॥
मर-मर करुनी पैसे तो कमावतो
पण मुलगा सारे पार्टीत उडवतो
मुलींसाठी मान खाली घालतो
पण पोरीला बापाचा मान कुठे कळतो
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥४॥
आई जेव्हा सोडुनी जाते
आसवे त्याची जातात विरुनी
पोरांना तो पोटाशी धरुनी
रडतो बिचारा आतुन-आतुनी
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥५॥

.....................................................................................................................................................................

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

चांदणे स्वरूपी चंदनाचे अंग
मुख पाहतांना तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली
टिळा देखुनिया दृष्टही पळाली
हसे बाळ माझा, विठू हासरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

ओठी अंगठ्याने करी सुधापान
तया चुंबण्याला लोभावते मन
दिसे बाळ माझा, राम सुंदरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा अभय सागरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

.....................................................................................................................................................................

आई

कुनीच नाही माझे ..आई

करूनेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई

ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई

असे जवळ? तसे दुर? भाबडे अंतराळ माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई

करूनेचे तळहात पोरके ..आई

असेल, आहे, असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई

अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई

अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई

करूनेचे तळहात पोरके ..आई

.....................................................................................................................................................................

प्रेमास्वरूप आई

प्रेमास्वरूप आई

प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिआ कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्ठरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

माधव ज्यूलिअन

.....................................................................................................................................................................

आई आई

आई
आई
दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आह

.....................................................................................................................................................................

आई, थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
थोर तुझे उपकार !!
आई, थोर तुझे उपकार !! ध्रु०!!

वदत विनोदें हांसत सोडी !!
कोण दुधाची धार !!१!!

नीज न आली तर गीत म्हने !!
प्रेम जिचे अनिवार !!२!!

येई दुखने तेव्हा मजला!!
कोण करी उपचार!!३!!

कोण कड़ेवर घेऊन फिरवी!!
चित्ती लोभ अपार!!४!!

बाळक दुर्बळ होतों तेव्हा!!
रक्षण केले फार!!५!!

त्वांची शिकाविले वाढविले त्वां!!
आहे मजवर भार!!६!!

स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें!!
होंते वारंवार!!७!!

नित्य करावे साह्य तुला मीं!!
हा माझा अधिकार!!८!!

भास्कर दामोदर पालंदे.

.....................................................................................................................................................................

आई असतो एक धागा

आई
आई

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेल गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?

आई खरच काय असते ,

लंगड्याचा पाय असते , वासराची गाय असते
दुधावरची साय असते , लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही .

- फ. मु. शिंदे

.....................................................................................................................................................................

माँ से बड़कर कौन ?

माँ की बेकदरी ना करना दोस्तों
माँ से बड़कर कौन ?
माँ ने हमको जन्म दिया है
माँ से बड़कर कौन ?
माँ ने हमको पाला पोसा बड़ा किया है
माँ की बेकदरी न करना दोस्तों
माँ से बड़कर कौन ?
माँ का आश्रीवाध जिसने पाया
दुनिया मैं उसने नाम कमाया
माँ जब खाती है तुम्हारी याद सताती है
माँ जब सोती है तुम्हारी याद सताती है
माँ जब रोती है तुम्हारी याद सताती है
माँ की बेकदरी न करना दोस्तों
माँ से बड़कर कौन ?
माँ मंदिर मस्जिद और गुरूद्वारे मैं जाती है
माँ पूजा भी तुम्हारे लिए करती है
माँ के दिल को न दुखाना मेरे दोस्तों
भगवान से बड़कर माँ का नाम है
भूल न जाना माँ के नाम को
माँ से बड़कर कौन ?
माँ के दूध के कर्ज को किसने चुकाया है
ये आजतक हमने दुनिया मैं नहीं पाया है
माँ के चरणों मै शीश झुकावो
माँ के गुण गान गाते जावो
माँ की हमेशा तुम्हारे लिए एक ही आश है
वो रास्ता तुम्हें मिल जायेगा जिसकी तुम्हें तलाश है
फूलों काँटों का दर्द माँ ने सहा है
इसको जानता है कौन
जब तक दुनिया मैं सूरज चांद रहेगा
तब तक एस दुनिया मैं माँ का नाम रहेगा

.....................................................................................................................................................................

सो कुदरत का इनाम है वो, कोई और नही माँ है वो

तपती धुप में बन के साया, हर दुख से मुझे बचाया
खुद गमो के पहाड़ उठाये, सारे सुख़ मुझ को पहुंचाए !
इंसानियत की पहचान है वो, कोई और नही सिर्फ माँ है वो !!

अच्छी बुरी हर बात बताई, हक की सच्ची रह दिखाई
क्या भला है और क्या बुरा, उसने हमें पहचान करायी !
हर मुस्किल की ढलान है वो, कोई और नही सिर्फ माँ है वो !!

वो जिसकी दुआ हर दम साथ रहे , शाम ढलने तक जो तुम्हारी राह तके
दिल में जो हजार अरमान जगाती , अपनी औलाद की खुशी है चाहती
सो कुदरत का इनाम है वो, कोई और नही माँ है वो......!!!

.....................................................................................................................................................................

माँ संवेदना है, भावना है, अहसास है

माँ संवेदना है, भावना है, अहसास है
माँ जीवन के फूलों में ख़ुशबू का वास है
माँ रोते हुए बच्चे का ख़ुशनुमा पलना है
माँ मरुथल में नदी या मीठा-सा झरना है
माँ लोरी है, गीत है, प्यारी-सी थाप है
माँ पूजा की थाली है, मंत्रों का जाप है
माँ आँखों का सिसकता हुआ किनारा है
माँ गालों पर पप्पी है, ममता की धारा है
माँ झुलसते दिलों में कोयल की बोली है
माँ मेहंदी है, कुमकुम है, सिंदूर है, रोली है
माँ क़लम है, दवात है, स्याही है,
माँ परमात्मा की स्वयं एक गवाही है
माँ त्याग है, तपस्या है, सेवा है
माँ फूँक से ठंडा किया हुआ कलेवा है
माँ अनुष्ठान है, साधना है, जीवन का हवन है
माँ ज़िंदगी के मुहल्ले में आत्मा का भवन है
माँ चूड़ी वाले हाथों के मजबूत कंधों का नाम है
माँ काशी है, काबा है और चारों धाम है
माँ चिंता है, याद है, हिचकी है
माँ बच्चे की चोट पर सिसकी है
माँ चुल्हा-धुआँ-रोटी और हाथों का छाला है
माँ ज़िंदगी की कड़वाहट में अमृत का प्याला है
माँ पृथ्वी है, जगत् है, धुरी है
माँ बिना इस सृष्टि की कल्पना अधूरी है
तो माँ की ये कथा अनादि है
ये अध्याय नहीं है…

.....................................................................................................................................................................

No comments:

Post a Comment