Tuesday, October 5, 2010

आगरी-कोळी photo

आगरी-कोळी माणूस २०२० मध्ये

मुंबई,नवी मुंबई,रायगड,ठाणे येथील आगरी-कोळी माणसाचे मेणाचे पुतळे म्युझीअम मध्ये ठेवले गेले होते. शाळेतील मुले ते पाहायला आली होती आणि विचारत होती.
विद्यार्थी : हा माणूस कुठला गुरुजी?
गुरुजी : पहिल्याच्या काळी मच्छी पकडणारे व विकणारे अन शेती करणारे लोक इथे राहत होते, येथील ते आद्य रहिवासी(म्हणजे मूळ रहिवासी) होते.येथील जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या, ते लोक येथील समुद्राचे आणि जमिनीचे राजे होते, शिवाजी राजांनी देखील त्यांचा सन्मान केला होता, ते शूर होते.कान्होजी आंग्रे सारखा वीरपुरुष ज्याने पहिले आरमार बनविले ते त्यांच्याच वंशाचे होते.
विद्यार्थी: मग गुरुजी एवढा शूर माणूस आता कुठे गेला?
गुरुजी: ह्या माणसाने कधीच भविष्याचा विचार केला नाही, ह्या माणसाने आपले आयुष्य दारू, जुगार, आणि मौज मजा करण्यात फुकट घालवले.ह्या माणसाने आपले शौर्य आपसात लढण्यात घालवले.हा माणूस वाघ होता, वाघ कधीच कळपात राहत नाही तो एकटा राजा असतो. त्यामुळे त्याच्या कडे एकीचे बळ नसते गट बनवण्याचे फायदे त्याला कळत नाहीत आणि मग १०० कुत्रे मिळून वाघाला देखील खातात, त्याची देखील शिकार होते.भारतात वाघ जसे दुर्मिळ झालेत तसेच काळाच्या पडद्यात हा माणूस दुर्मिळ होत गेला आणि हरवला. सिंहासारखा जगला असता, कळप बनवून एकमेकांना सांभाळून राहिला असता तर मी आज तुम्हाला खरा आगरी-कोळी माणूस दाखवू शकलो असतो.

जगातली लोक सांगतात आगरी लोक कमी का?.

जगातली लोक सांगतात आगरी लोक कमी का?.... उत्तर - कारण निसर्गाचा नियम आहे कि वाघाची संख्या वाढली तर बाकीचे जीव धोक्यात येतील ...

.दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. ह्या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगाव-पासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. ह्या समाजाची बोली ती आगरी बोली असे ह्या बोलीचे नामकरण करता येईल; परंतु आगरी ही एक जात समजली जाते; तेव्हा अशी जातीची बोली-आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता ह्या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या ह्या बोलीस आगरातील बोली - ‘आगर बोली' म्हणजे सयुक्तिक वाटते.

ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्‍चार-स्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी सानुनासिक आहे. तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे, तर नवी मुंबईतील ही बोली कोळी बोली मिश्रित अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोली मिश्रित अशी येते.

आगरी समाजाचे पूर्वी (१) शुद्ध आगरी, (२) दस आगरी व (३) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात; तेही आता मानले जात नाहीत.

आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘ळ'च्या ऐवजी ‘ल' व ‘ण'च्या ऐवजी ‘न' जसे सकाळ-सकाल, पळव-पलव; कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.
ह्या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषत: लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्वरीत ते जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हातार्‍या आजीकडून - डोकर्‍यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.

गाय बा चर्‍हतं भीमा तीरी गो,
भीमा तीऽऽरी
गायला राखीत किस्‍न हरी गो,
किस्‍न हऽऽरी
काय बा वर्नू गायची शेपू गो,
गायची शेऽऽपू,
जशी नांगीन घेतं झेपू गो,
नांगीन घेतं झेऽऽपूू
काय बा वर्नू गायच्या मांड्या गो,
गायच्या मांऽऽड्या
जशी पालुखीच्या दांड्या गो
पालुखीच्या दांऽऽड्या -

इथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.
आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. ह्या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टींच्या ओनाम्याला येते ती तीन भांवडांची गोष्ट-

अकामकची गोष्ट
यक व्हता अका, यक व्हता मका. आन त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.
(यक-एक, व्हता-होता, खारीन-खाडीत, झोलाला-मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी) - मासळीचे प्रकार, चुलीन-चुलीत, भुजत-भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली - करपली, डोचूक - डोके, जवान - जेवण.)१

कावला - चिरीची गोष्ट
यकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी कार्‍हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, ‘चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्या गोनी दे.' चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, ‘कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, ‘कावलंदादा, तुझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'

दृष्टांतपाठात शोभाव्या अशा कितीतरी लोककथा आगर बोलीत आहेत. अशी बोली ऐकताना ह्या बोलीची
दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. ह्या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगाव-पासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. ह्या समाजाची बोली ती आगरी बोली असे ह्या बोलीचे नामकरण करता येईल; परंतु आगरी ही एक जात समजली जाते; तेव्हा अशी जातीची बोली-आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता ह्या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या ह्या बोलीस आगरातील बोली - ‘आगर बोली' म्हणजे सयुक्तिक वाटते.

ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्‍चार-स्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी सानुनासिक आहे. तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे, तर नवी मुंबईतील ही बोली कोळी बोली मिश्रित अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोली मिश्रित अशी येते.

आगरी समाजाचे पूर्वी (१) शुद्ध आगरी, (२) दस आगरी व (३) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात; तेही आता मानले जात नाहीत.

आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘ळ'च्या ऐवजी ‘ल' व ‘ण'च्या ऐवजी ‘न' जसे सकाळ-सकाल, पळव-पलव; कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.
ह्या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषत: लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्वरीत ते जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हातार्‍या आजीकडून - डोकर्‍यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.

गाय बा चर्‍हतं भीमा तीरी गो,
भीमा तीऽऽरी
गायला राखीत किस्‍न हरी गो,
किस्‍न हऽऽरी
काय बा वर्नू गायची शेपू गो,
गायची शेऽऽपू,
जशी नांगीन घेतं झेपू गो,
नांगीन घेतं झेऽऽपूू
काय बा वर्नू गायच्या मांड्या गो,
गायच्या मांऽऽड्या
जशी पालुखीच्या दांड्या गो
पालुखीच्या दांऽऽड्या -

इथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.
आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. ह्या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टींच्या ओनाम्याला येते ती तीन भांवडांची गोष्ट-

अकामकची गोष्ट
यक व्हता अका, यक व्हता मका. आन त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.
(यक-एक, व्हता-होता, खारीन-खाडीत, झोलाला-मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी) - मासळीचे प्रकार, चुलीन-चुलीत, भुजत-भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली - करपली, डोचूक - डोके, जवान - जेवण.)१

कावला - चिरीची गोष्ट
यकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी कार्‍हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, ‘चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्या गोनी दे.' चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, ‘कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, ‘कावलंदादा, तुझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'

दृष्टांतपाठात शोभाव्या अशा कितीतरी लोककथा आगर बोलीत आहेत. अशी बोली ऐकताना ह्या बोलीची

"गल्यान्‌ साखली सोन्याची ही पोरी कोनाची' या लोकप्रिय गाण्याशिवाय आजही महविद्यालयातील विद्यार्थ्यांची पिकनिक पूर्ण होत नाही. या गाण्याचे बोल जसे उच्चारासाठी सहज आणि सोपे वाटतात. हे गाणं आहे आगरी बोलीतलं. ही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे. या भाषेवर कोळी आणि कोकणी भाषेचा काहीसा प्रभाव जाणवतो. 90च्या दशकापासून या समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता या समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.
आगरी शब्दातील मूळ शब्द आगर. आगर म्हणजे भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा. या शब्दावरून आगर पिकविणारा तो आगरी. भातशेती हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट. समुद्र, खाडी किनारी हा समाज मोठ्या संख्येने आहे. आगरी लोकांना कुणबी, खारकी अशीही विशेषणे आहेत. आगरी समाजातील शेतकऱ्याला कुणबी या अर्थाने ओळखले जात असे. जुन्या पुस्तकांमध्ये आगरी समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील मावळे हे आगरी, कोळी समाजातील होते. पुस्तकांमध्ये आरमारकरी, तराकेवाले असा आगरी समाजाविषयी उल्लेख आहे. अलिबाग, पालघर, डहाणू परिसरातील आगरी समाजाला खारपाटी म्हणूनही संबोधण्यात येते. समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या समाजाला उथळी म्हटले जाते. आगरी समाजाच्या शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी अशा पोटजाती आहेत. केवळ मिठाची शेती करून उपजीविका करणारे ते मीठआगरी. पिढ्यान्‌ पिढ्या ढोल वाजविणारे ते ढोल आगरी. बागबगिचे, उद्यानांमध्ये काम करणारे ते जस आगरी म्हणून ओळखले जातात. दास आगरी समाज पालघर तालुक्‍यात आढळतो. उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला आगरी समाज समाजाविषयी अभिमान बाळगून आहे. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरानुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती ही भाषा बोलतात.
नव्या पिढीला आगरी भाषेविषयी औत्सुक्‍य वाटते. तसेच काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बुशकोट, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफ पॅन्ट, बुशकोट, टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. लग्न समारंभातील हळदीची आणि परंपरागत आगरी भाषेतील गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. कारण आगरी भाषेत लग्न समारंभाविषयीची माहिती या विशिष्ट गाण्यामधून कळायची. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकाला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने शद्ब उच्चार आणि बोलण्याची ढब बदलली आहे. पूर्वी कुटुंबातील महिलेला किंवा बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "दादुस' म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. "इच्या बना' ही शिवी-वजा विशेषणाचा सऱ्हार्स वापर केला जायचा. मात्र आता त्याच्यावर काहीसे र्निबंध आल्याचे जाणवते. किंवा हे वाक्‍य विस्मरणात गेले. आगरी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोली भाषेतून जाणवतो. तर आगरी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोली भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोली भाषा काळानुरूप बदलत आहेत. नवा बदल या मंडळींच्या अंगवळणी पडत आहे. समाजातील काही तरुण मंडळींनी agrisamaj.com ही वेब साईट सुरू केली आहे. यामध्ये आगरी समाजाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाज ग्लोबल झाला आहे

आगरी-कोळी माणूस २०२० मध्ये

मुंबई,नवी मुंबई,रायगड,ठाणे येथील आगरी-कोळी माणसाचे मेणाचे पुतळे म्युझीअम मध्ये ठेवले गेले होते. शाळेतील मुले ते पाहायला आली होती आणि विचारत होती.

विद्यार्थी : हा माणूस कुठला गुरुजी?
गुरुजी : पहिल्याच्या काळी मच्छी पकडणारे व विकणारे अन शेती करणारे लोक इथे राहत होते, येथील ते आद्य रहिवासी(म्हणजे मूळ रहिवासी) होते.येथील जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या, ते लोक येथील समुद्राचे आणि जमिनीचे राजे होते, शिवाजी राजांनी देखील त्यांचा सन्मान केला होता, ते शूर होते.कान्होजी आंग्रे सारखा वीरपुरुष ज्याने पहिले आरमार बनविले ते त्यांच्याच वंशाचे होते.
विद्यार्थी: मग गुरुजी एवढा शूर माणूस आता कुठे गेला?
गुरुजी: ह्या माणसाने कधीच भविष्याचा विचार केला नाही, ह्या माणसाने आपले आयुष्य दारू, जुगार, आणि मौज मजा करण्यात फुकट घालवले.ह्या माणसाने आपले शौर्य आपसात लढण्यात घालवले.हा माणूस वाघ होता, वाघ कधीच कळपात राहत नाही तो एकटा राजा असतो. त्यामुळे त्याच्या कडे एकीचे बळ नसते गट बनवण्याचे फायदे त्याला कळत नाहीत आणि मग १०० कुत्रे मिळून वाघाला देखील खातात, त्याची देखील शिकार होते.भारतात वाघ जसे दुर्मिळ झालेत तसेच काळाच्या पडद्यात हा माणूस दुर्मिळ होत गेला आणि हरवला. सिंहासारखा जगला असता, कळप बनवून एकमेकांना सांभाळून राहिला असता तर मी आज तुम्हाला खरा आगरी-कोळी माणूस दाखवू शकलो असतो.

लालबागच्या राजाची स्थापना

 लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार सन 1932 साली बंद ...होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे 1934 साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्री ची मूर्ती प्रसिध्द झाली.

आगरी समाजाचे पूर्वी (१) शुद्ध आगरी, (२) दस आगरी व (३) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात; तेही आता मानले जात नाहीत.

आगरी टिकविण्याची चर्चा करताना त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. आगरी माणूस जागतिक पातळीवर पोचला, तर त्याची भाषाही मोठी होईल; पण तुम्ही कुठेही गेलात तरी स्वभाषेचा अभिमान बाळगणं, तिच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणं ही त्यासाठीची पूर्वअट आहे

मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.

"गल्यान्‌ साखली सोन्याची ही पोरी कोनाची' या लोकप्रिय गाण्याशिवाय आजही महविद्यालयातील विद्यार्थ्यांची पिकनिक पूर्ण होत नाही. या गाण्याचे बोल जसे उच्चारासाठी सहज आणि सोपे वाटतात. हे गाणं आहे आगरी बोलीतलं. ही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि... कणखरही आहे. या भाषेवर कोळी आणि कोकणी भाषेचा काहीसा प्रभाव जाणवतो. 90च्या दशकापासून या समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता या समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.
आगरी शब्दातील मूळ शब्द आगर. आगर म्हणजे भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा. या शब्दावरून आगर पिकविणारा तो आगरी. भातशेती हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट. समुद्र, खाडी किनारी हा समाज मोठ्या संख्येने आहे. आगरी लोकांना कुणबी, खारकी अशीही विशेषणे आहेत. आगरी समाजातील शेतकऱ्याला कुणबी या अर्थाने ओळखले जात असे. जुन्या पुस्तकांमध्ये आगरी समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील मावळे हे आगरी, कोळी समाजातील होते. पुस्तकांमध्ये आरमारकरी, तराकेवाले असा आगरी समाजाविषयी उल्लेख आहे. अलिबाग, पालघर, डहाणू परिसरातील आगरी समाजाला खारपाटी म्हणूनही संबोधण्यात येते. समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या समाजाला उथळी म्हटले जाते. आगरी समाजाच्या शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी अशा पोटजाती आहेत. केवळ मिठाची शेती करून उपजीविका करणारे ते मीठआगरी. पिढ्यान्‌ पिढ्या ढोल वाजविणारे ते ढोल आगरी. बागबगिचे, उद्यानांमध्ये काम करणारे ते जस आगरी म्हणून ओळखले जातात. दास आगरी समाज पालघर तालुक्‍यात आढळतो. उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला आगरी समाज समाजाविषयी अभिमान बाळगून आहे. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरानुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती ही भाषा बोलतात.
नव्या पिढीला आगरी भाषेविषयी औत्सुक्‍य वाटते. तसेच काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बुशकोट, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफ पॅन्ट, बुशकोट, टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. लग्न समारंभातील हळदीची आणि परंपरागत आगरी भाषेतील गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. कारण आगरी भाषेत लग्न समारंभाविषयीची माहिती या विशिष्ट गाण्यामधून कळायची. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकाला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने शद्ब उच्चार आणि बोलण्याची ढब बदलली आहे. पूर्वी कुटुंबातील महिलेला किंवा बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "दादुस' म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. "इच्या बना' ही शिवी-वजा विशेषणाचा सऱ्हार्स वापर केला जायचा. मात्र आता त्याच्यावर काहीसे र्निबंध आल्याचे जाणवते. किंवा हे वाक्‍य विस्मरणात गेले. आगरी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोली भाषेतून जाणवतो. तर आगरी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोली भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोली भाषा काळानुरूप बदलत आहेत. नवा बदल या मंडळींच्या अंगवळणी पडत आहे. समाजातील काही तरुण मंडळींनी agrisamaj.com ही वेब साईट सुरू केली आहे. यामध्ये आगरी समाजाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाज ग्लोबल झाला आहे

आगरी भाषा

आगरी माणसासारखीच त्याची भाषाही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे.90च्या दशकापासून या समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता या समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात.

आगरी समाजाचे पूर्वी (१) शुद्ध आगरी, (२) दस आगरी व (३) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात; तेही आता मानले जात नाहीत.

Sunday, September 5, 2010

गोविंदा

Email Timepass: BABA RAMDEV's DAUGHTER

BABA RAMDEV's DAUGHTER

Paul Maharaj - पॉल महाराज: Ask your questions to Paul Maharaj

Paul Maharaj - पॉल महाराज: Ask your questions to Paul Maharaj:

अंगाई

गाऊन अंगाई कधी आई ने शांत मला झोपवून दिल,
नको मी एकटी कधी म्हणून पदरात तिने लपेटून दिल..

मायेने हात तिचा सतत माझ्या डोक्यावर ठेवला,
नको जगात हरवून जायला म्हणून सतत मला बिलगुण ठेवल

तिच्या त्या प्रेमळ आवाजात सप्त सुरांचा मेळ आहे,
ऐकून हाक तिच्या तोंडून कर्ण माझे तृप्त आहे..

आई च्या काळजीत, काळीज माझ अलगद झुलते आहे,
तो प्रेमळ झोका मला स्वर्गाचा दर्शन करुन देत आहे..!

साभार आणि कवियेत्री
रुची

.....................................................................................................................................................................

माझी माय....

माझी माय असते गावाकडे
डोळे तीचे सगळे माझ्याकडे
एकदाही नाही विचारल तुला
येतीस का ग इकडे

सकाळी पोळ्या करता करता
कधी चमक भरायची कमरेत
तेव्हा एकदाही नाही बाम
लावू वाटला ग तुला

एकदा जत्रेला जायचं होतं मला
तेव्हा भात उतरताना टार्कन
आलेला फोड पाहून यात्रेतन
चिमटाही नाही आणू वाटला ग तुला

माझ्या चुका बापा पासून
नेहमी लपवत तू होतीस
तेव्हा एकदाही नाही वाटलं
बाप ओरडेल का ग तुला

आज आहे मी त्या वळणावर
ज्या वळणावर तू होतीस
तेव्हा तुझे ते बोल आठवतात
"बाबा माय हाय तर सगळ हाय
बाकी कुनाचं कोन न्हाय "
कुनाचं कोन न्हाय...............

.....................................................................................................................................................................

मी आणि ताई भांड भांड भांडायचो.........

मी आणि ताई भांड भांड भांडायचो
नुसतेच फटके नाही ,एक्मेंकाना बोच्कारायचो

सकाळी उठल्या पासून भांडण सुरु व्हायचे
एकच सायकल कुणी न्यायची ethun युद्ध व्हायचे

चोकलेट कोणाला जास्त,संत्र कोणाच मोठ यावर पण आम्ही खूप भांडायचो
भांडा भांडीत एकमेकांच्या वस्तू तोडायचो

मारून बोच्कारून ताई मुसुमुसु रडायची आणि मी हसायचो
आणि मग बाबान कडून धपाधप मार खायचो......

...........................आणि अचानक बाबा गेले

तूच सायकल ने ,मला जवळ जायचं आहे अस आम्ही दोघ हि म्हणायचो
किती हि उशीर झाला तरी एकमेकांची जेवायसाठी वाट पाहायचो

संत्र,चोकलेट खायची आमची परिस्थती नाही राहिली
पण पेपरमिंट ची गोळी सुद्धा ताईने माझ्या शिवाय नाही खाल्ली

ताईच लग्न ठरल ,ताईची वरात आली
मी ताईच्या गळ्यात व ताई माझ्या गळ्यात पडून ढसा ढसा रडलो

बाबा असताना हि आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो,फक्त भांडायचो
.......बाबा जाण्याने एक फरक पडला
त्यांची उणीव कमी करायचं दोघांनी हि प्रयत्न केला.......

.....................................................................................................................................................................

"माय"

कधीमधी उगाचच वाटत राहतं,
आपणही आभाळ व्हायला हवं होतं..
मायच्या फाटक्या नशीबावर,
फाटकं का होईना..
पांघरुण व्हायला हवं होतं.

पापणी होऊन अलगद,
तिच्या आसवांना झेलायला हवं होतं..
तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवुन का होईना ..
भरपुर पाझरायला हवं होतं.

तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर,
जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं..
राहुन राहुन मन खंतावतंय,
एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन..
मनसोक्त रडायला हवं होतं.

.....................................................................................................................................................................

एका आईची अंतयात्रा..

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
कीनारी पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही
- तुझी प्रेमस्वरुप आई

.....................................................................................................................................................................

"लक्षात नसलेला बाप"

आपल्या सांगा विचारे कोण?
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥ध्रु॥
आई तुझी मांगल्य घराचे
पण बाप,पप्पा अस्तित्व हो तुमचे
कळते तुम्हा दु:ख आईचे
पण आईस धीर असते बापाचे
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥१॥
आई मुलाला जन्म जेव्हा देते
सर्वथा कौतुक तीचेच होते
हॉस्पिटल बाहेर धावपळ ज्याची होते
त्या व्यस्त बापाची दखल कोण घेते
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥२॥
म्हणे जिजाईने शिवाजी घडवला
पण शहाजीने जिवाचा रान केला
राम जेव्हा वनवासी गेला
पुत्र शोकाने दशरथ हो मेला
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥३॥
मर-मर करुनी पैसे तो कमावतो
पण मुलगा सारे पार्टीत उडवतो
मुलींसाठी मान खाली घालतो
पण पोरीला बापाचा मान कुठे कळतो
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥४॥
आई जेव्हा सोडुनी जाते
आसवे त्याची जातात विरुनी
पोरांना तो पोटाशी धरुनी
रडतो बिचारा आतुन-आतुनी
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥५॥

.....................................................................................................................................................................

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

चांदणे स्वरूपी चंदनाचे अंग
मुख पाहतांना तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली
टिळा देखुनिया दृष्टही पळाली
हसे बाळ माझा, विठू हासरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

ओठी अंगठ्याने करी सुधापान
तया चुंबण्याला लोभावते मन
दिसे बाळ माझा, राम सुंदरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा अभय सागरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

.....................................................................................................................................................................

आई

कुनीच नाही माझे ..आई

करूनेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई

ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई

असे जवळ? तसे दुर? भाबडे अंतराळ माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई

करूनेचे तळहात पोरके ..आई

असेल, आहे, असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई

अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई

अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई

करूनेचे तळहात पोरके ..आई

.....................................................................................................................................................................

प्रेमास्वरूप आई

प्रेमास्वरूप आई

प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिआ कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्ठरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

माधव ज्यूलिअन

.....................................................................................................................................................................

आई आई

आई
आई
दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आह

.....................................................................................................................................................................

आई, थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
थोर तुझे उपकार !!
आई, थोर तुझे उपकार !! ध्रु०!!

वदत विनोदें हांसत सोडी !!
कोण दुधाची धार !!१!!

नीज न आली तर गीत म्हने !!
प्रेम जिचे अनिवार !!२!!

येई दुखने तेव्हा मजला!!
कोण करी उपचार!!३!!

कोण कड़ेवर घेऊन फिरवी!!
चित्ती लोभ अपार!!४!!

बाळक दुर्बळ होतों तेव्हा!!
रक्षण केले फार!!५!!

त्वांची शिकाविले वाढविले त्वां!!
आहे मजवर भार!!६!!

स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें!!
होंते वारंवार!!७!!

नित्य करावे साह्य तुला मीं!!
हा माझा अधिकार!!८!!

भास्कर दामोदर पालंदे.

.....................................................................................................................................................................

आई असतो एक धागा

आई
आई

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेल गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?

आई खरच काय असते ,

लंगड्याचा पाय असते , वासराची गाय असते
दुधावरची साय असते , लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही .

- फ. मु. शिंदे

.....................................................................................................................................................................

माँ से बड़कर कौन ?

माँ की बेकदरी ना करना दोस्तों
माँ से बड़कर कौन ?
माँ ने हमको जन्म दिया है
माँ से बड़कर कौन ?
माँ ने हमको पाला पोसा बड़ा किया है
माँ की बेकदरी न करना दोस्तों
माँ से बड़कर कौन ?
माँ का आश्रीवाध जिसने पाया
दुनिया मैं उसने नाम कमाया
माँ जब खाती है तुम्हारी याद सताती है
माँ जब सोती है तुम्हारी याद सताती है
माँ जब रोती है तुम्हारी याद सताती है
माँ की बेकदरी न करना दोस्तों
माँ से बड़कर कौन ?
माँ मंदिर मस्जिद और गुरूद्वारे मैं जाती है
माँ पूजा भी तुम्हारे लिए करती है
माँ के दिल को न दुखाना मेरे दोस्तों
भगवान से बड़कर माँ का नाम है
भूल न जाना माँ के नाम को
माँ से बड़कर कौन ?
माँ के दूध के कर्ज को किसने चुकाया है
ये आजतक हमने दुनिया मैं नहीं पाया है
माँ के चरणों मै शीश झुकावो
माँ के गुण गान गाते जावो
माँ की हमेशा तुम्हारे लिए एक ही आश है
वो रास्ता तुम्हें मिल जायेगा जिसकी तुम्हें तलाश है
फूलों काँटों का दर्द माँ ने सहा है
इसको जानता है कौन
जब तक दुनिया मैं सूरज चांद रहेगा
तब तक एस दुनिया मैं माँ का नाम रहेगा

.....................................................................................................................................................................

सो कुदरत का इनाम है वो, कोई और नही माँ है वो

तपती धुप में बन के साया, हर दुख से मुझे बचाया
खुद गमो के पहाड़ उठाये, सारे सुख़ मुझ को पहुंचाए !
इंसानियत की पहचान है वो, कोई और नही सिर्फ माँ है वो !!

अच्छी बुरी हर बात बताई, हक की सच्ची रह दिखाई
क्या भला है और क्या बुरा, उसने हमें पहचान करायी !
हर मुस्किल की ढलान है वो, कोई और नही सिर्फ माँ है वो !!

वो जिसकी दुआ हर दम साथ रहे , शाम ढलने तक जो तुम्हारी राह तके
दिल में जो हजार अरमान जगाती , अपनी औलाद की खुशी है चाहती
सो कुदरत का इनाम है वो, कोई और नही माँ है वो......!!!

.....................................................................................................................................................................

माँ संवेदना है, भावना है, अहसास है

माँ संवेदना है, भावना है, अहसास है
माँ जीवन के फूलों में ख़ुशबू का वास है
माँ रोते हुए बच्चे का ख़ुशनुमा पलना है
माँ मरुथल में नदी या मीठा-सा झरना है
माँ लोरी है, गीत है, प्यारी-सी थाप है
माँ पूजा की थाली है, मंत्रों का जाप है
माँ आँखों का सिसकता हुआ किनारा है
माँ गालों पर पप्पी है, ममता की धारा है
माँ झुलसते दिलों में कोयल की बोली है
माँ मेहंदी है, कुमकुम है, सिंदूर है, रोली है
माँ क़लम है, दवात है, स्याही है,
माँ परमात्मा की स्वयं एक गवाही है
माँ त्याग है, तपस्या है, सेवा है
माँ फूँक से ठंडा किया हुआ कलेवा है
माँ अनुष्ठान है, साधना है, जीवन का हवन है
माँ ज़िंदगी के मुहल्ले में आत्मा का भवन है
माँ चूड़ी वाले हाथों के मजबूत कंधों का नाम है
माँ काशी है, काबा है और चारों धाम है
माँ चिंता है, याद है, हिचकी है
माँ बच्चे की चोट पर सिसकी है
माँ चुल्हा-धुआँ-रोटी और हाथों का छाला है
माँ ज़िंदगी की कड़वाहट में अमृत का प्याला है
माँ पृथ्वी है, जगत् है, धुरी है
माँ बिना इस सृष्टि की कल्पना अधूरी है
तो माँ की ये कथा अनादि है
ये अध्याय नहीं है…

.....................................................................................................................................................................

लालबागचा राजा 1951- 1960

लालबागचा राजा 1957
लालबागचा राजा 1956
लालबागचा राजा 1958
लालबागचा राजा 1959
लालबागचा राजा 1960
लालबागचा राजा 1951
लालबागचा राजा 1953
लालबागचा राजा 1954
लालबागचा राजा 1955

लालबागचा राजा 1961- 1970

लालबागचा राजा 1961       

लालबागचा राजा 1962

लालबागचा राजा 1963
लालबागचा राजा 1964
लालबागचा राजा 1965
लालबागचा राजा 1966
लालबागचा राजा 1967
लालबागचा राजा 1968
लालबागचा राजा 1969
लालबागचा राजा 1970