Tuesday, October 5, 2010

आगरी भाषा

आगरी माणसासारखीच त्याची भाषाही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे.90च्या दशकापासून या समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता या समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात.

 

आगरी समाजाचे पूर्वी (१) शुद्ध आगरी, (२) दस आगरी व (३) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात; तेही आता मानले जात नाहीत.

 

No comments:

Post a Comment