Showing posts with label विनोदी कविता. Show all posts
Showing posts with label विनोदी कविता. Show all posts

Thursday, September 2, 2010

जे जे तुला रुचेल, तेच काम मी करेन !

जो तुमको हो पसंद ह्या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद.
जे जे तुला रुचेल, तेच काम मी करेन |
तू दिवसा रात्र म्हणशील, तर रात्र मी म्हणेन || धृ ||
पसंत करेन, पत्करेन, तुलाची मी प्रशंसेन |
प्राण नयनी असेस्तोवर, तुलाची मी न्याहाळेन |
हृद् भावना तुझ्या मी, माझ्या मुखे वदेन || १ ||
तू साथ ना देतीस तर, मी संपतो कधीचा |
तुजमुळेची तृप्त कामना, झालेल्या जीवनी ह्या |
ह्या जीवनास माझ्या, तुझी 'भेट' मी म्हणेन || २ ||
मराठी अनुवाद:
नरेंद्र गोळे २००६

पत्र - भाऊसाहेब पाटणकर

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे
 संकलक -पद्माकर

चायनीज नुडल्स

चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स
पोळी भाजी भाताचे घ्या
एकत्रच सगळे रस
चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स

तो चिनी बाबा आला तर
वाटीत जीव द्यायचा
पंजाबी मसाल्यांचा वास
त्याचा नाकात इतका जायचा
आपली परंपरा नेहमी
आहार असावा सकस
चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स

दोन काड्या सोडून आपण
घेतला हातात काटा
कोणत्याही देशाचे पदार्थ असो
आमचा असतोच वाटा
खायच्या बाबतीत सगळ्यांचे स्वागत
कुणाचाही नाही आकस
चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स

तुषार जोशी, नागपूर  

मध्यरात्री जागणे -

एक आयुर्वेदिक गझल॥ ॐ धन्वंतरये नमः ॥
मध्यरात्री जागणे वाईट असते
अन दुपारी झोपणे वाईट असते
सारखे रागावणे वाईट असते
सारखे वैतागणे वाईट असते
दूध अन फळ मिसळणे वाईट असते
फ्रीजचे पाणी पिणे वाईट असते
चिप्सपिझ्झे चापणे वाईट असते
कोकपेप्सी ढोसणे वाईट असते
दूध घेणे टाळणे वाईट असते
अन चहाकॉफी पिणे वाईट असते
प्रौढ स्त्रीला सेवणे वाईट असते
अन स्वतःशी खेळणे वाईट असते
यौवनाने माजणे वाईट असते
वृद्धपण नाकारणे वाईट असते
सप्तधातू बिघडणे वाईट असते
दोषतिन्ही बिनसणे वाईट असते
आळसाने लोळणे वाईट असते
नित्यकर्मे टाळणे वाईट असते
देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते
- वैद्य माफी