Showing posts with label मराठी विनोद (163). Show all posts
Showing posts with label मराठी विनोद (163). Show all posts

Thursday, September 2, 2010

लई भारी ....भन्नाट मराठी विनोद !!!! { Marathi Vinod }

एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?
तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..
अधिकारी : का बरं ?
...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !

----------------
एक आदमी: संता के बेटा से, पापा घर पर हैं?

संता का बेटा, स्प्राइट पीते हुए, आपको मम्मी से मिलना है ना, ...
मम्मी घर पर है। सीधी बात नो बकवास..

----------------
पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा..

चिंगी : आई शप्पथ, मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस...


----------------
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."
सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"

----------------
काल मला १० जणांनी खूप मारला..
संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....

----------------
परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?

हे एकच ठिकाण आहे कि जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो.

" जरा दाखव कि "
...
आणि बरयाचवेळा ती दाखवतेही.... :P :D :D


----------------
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?

बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."


----------------
इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
...
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता.. 

----------------
पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....

बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......

पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...


----------------
संता : काल मी माझ्या बायको ला driver बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं

बंता : अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचास ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळल असतं...
...
संता : अरे बर झालो नाही गेलो ते, तो सिनेमा मी आधी पहिला होता..

----------------
मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?
मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?
मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..


----------------
मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

----------------
बहिण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो...
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : "पा".

----------------
मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो, त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते,
नोकर : काय म्याडम काय बनवता आहात?
मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे.

----------------
नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस?

बायको लक्षच देत नाही,

नवरा पुन्हा विचारतो.
...
काहीच उत्तर नाही.

तो पुन्हा विचारतो.

बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!

----------------
क्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?

मंग्या : अरे बहिणीशी रे ...

पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
...
मंग्या : बहिण तुझी आहे.... 

----------------
बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...

----------------
बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो...
बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो ..
चिंगीचे बाबा : कधी पासून .
बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून
चिंगीचे बाबा : हे शक्य नाही ...
...बंड्या : मग अजुन चार महीने थांबा ... तुमची खात्रीच पटेल...

----------------
आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी....

----------------
संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message...


----------------
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

बायकोबरोबरची खरेदी - पु. ल. देशपांडे ( विनोदी लेख )

Rakshya Bandhan Special.....

पुणेरी विनोद - Puneri Jokes

पुणेरी : ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला....
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.



-----------------------------------------------------------------------------------

एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: चायला! परत पुण्यात जन्माला आलो....!!


-----------------------------------------------------------------------------------

पुणेरी boyfriend -
मुलगा: I'll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk
on fire just for you.
मुलगी: wow किती romantic...! तू मला आत्ता भेटायला येशील का?
मुलगा: आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल...!



-----------------------------------------------------------------------------------
एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
.
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया...!"



-----------------------------------------------------------------------------------

 स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
.......
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
...तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

-----------------------------------------------------------------------------------

 स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)

पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
.
....
.
पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

Too Good Marathi Jokes

एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg.
पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.
चप्पल काढले आणि वजन केलं - ५० kg.
...
ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg.
एवढ्यात तिचे coin संपले.
फलाटावरचा भिकारी बोलला.
तू चालू ठेव, मी coin टाकतो.


------------------------------------------------

कुत्रे लग्न का नाही करत?
?
?
...
?
?
कारण ते आधीच कुत्र्याच आयुष जगत असतात.


------------------------------------------------

एका निर्जन ठिकाणी मंग्या त्याच्या आयटम बरोबर गाडीच्या पाठीमागे रंगात आला
होता.
आयटम : कोणी आल तर काय सांगायचं.
...मंग्या : सांगू गाडी चा टायर चेक करतोय.
बरयाच वेळा नंतर तिथे पोलिसांची गाडी आली.
पोलीस : काय रे, काय चाललंय काय?
मंग्या : गाडीचा टायर खराब झालाय तो चेक करत होतो.
पोलीस : गाडीचा ब्रेक पण चेक करून घे, गाडी गेली कधीच उतारावरून खाली.



------------------------------------------------

पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.

------------------------------------------------

एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,
गावकरी : मारला? वाघ... मारला?
शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?



------------------------------------------------


लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय.



------------------------------------------------

ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित
...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.'


शाळेतलं लव्ह लेटर..So Funny

मजेदार : उत्तर नसलेले काही प्रश्न

त्रासदायक नवरे : शरद उपाध्ये

(महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या लेख मालेतील लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)

ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते  ;  पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या  ,  विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात. नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले  ,  तरी तो त्रासदायकच वाटतो.


आदर्श नवरा दाखवा ,
हजार रुपये मिळवा

खरोखरच आपल्या बायकोच्या पसंतीला उतरणे हे बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालून दाखविण्याइतके कठीण काम. सदेह वैकुंठाला गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा एकदा वैतागून म्हणाले होते...

तीर्थ करूं जाता म्हणती कावळा , न करिता त्याला म्हणती बावळा

फार खाय त्याला म्हणती अघोरी , राक्षस हा असे खादाड भारी

थोडे खाय त्याची करिती टवाळी , अन्न कैसे पाप्याच्या कपाळी

तुका म्हणे किती राखावी मर्जी , संसाराचे त्रास घेता.

बायका नाट्य-समीक्षकांसारख्या असतात. विनोदी नाटक काढले , तर म्हणतात , ' अर्थहीन धांगडधिंगा. ' गंभीर नाटक काढले , तर म्हणतात , ' रिकाम्या नाट्यगृहातील अयशस्वी निर्माता. ' ऐतिहासिक नाटक काढले , तरी टीका , सामाजिक नाटक काढले , तरी टिंगलीचा सूर. म्हणून म्हणतात , ज्याला रस्ता माहीत असतो , पण ड्रायव्हिंग करता येत नाही , त्याला टीकाकार म्हणतात.

नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो. रसिक नवरा प्रेमाने बायकोला म्हणतो , '' तुझा चेहरा कसा चंदासारखा सुंदर दिसतोय. '' तर लगेच ती म्हणते , '' काय हो हा तुमचा नेहमीचा टोमणे मारण्याचा त्रास! सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून ?''

हनिमूनहून परतलेली स्मिता आईला सांगत होती , '' हा म्हणजे न अगदी येडचॅपच आहे. जाताना गाडीत अगदी वेगळा , घोगरा आवाज काढून माझा हात हातात घेऊन म्हणाला , ' स्मितू , अखेर आपण दोघे एकरूप झालो. ' अग , मला एवढी भूक लागली होती आणि हा अगदी बोअर करत होता. शेवटी मी त्याला सांगितले , ' जेवणाची ताटे दोघांची वेगवेगळी सांगा हं! ''

ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात.

एकदा माझा कार्यक्रम संपल्यावर एक बाई तावातावाने आत येऊन म्हणाल्या , '' अहो मेष राशीचे पुरुष तडफदार असतात , असे मी वाचले आहे. पण माझा नवरा तर अगदीच मेषपात्र आहे. ''

आणखी एक तक्रार त्रासदायक नवऱ्यांबद्दल बायका नेहमी करतात , '' आमचं हे येडं श्रावणबाळ आहे. बायको घरी आली , तरी आईचा पदर काही सोडत नाही. कोणत्याही वेळी आई अशी हाक मारतो. ''

एक नवरा तर जेवायला बसला की , पोळी हातात पकडून विमनस्कपणे सूक्ष्मात बघत गायचा , '' आई तुझी आठवण येते ''. शेवटी ती बाई एके दिवशी वैतागून म्हणाली , '' आईच्या हातच्या पोळ्या एवढ्या प्रिय असतील ना , तर जा आईकडेच हा कटोरा घेऊन. ''

हळवा नवरा बायकांना विलक्षण तापदायक वाटतो. लग्नानंतर काही महिन्यांतच कविताला दिवस गेले. मधून मधून उलट्या होऊ लागल्या आणि ती इतकी आनंदित झालेली असताना तिचा नवरा मात्र डोळ्यांत पाणी आणून म्हणाला , '' काऊ , किती ग त्रास होतोय तुला! खरंच ग , स्त्रीचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी. '' आणि तिच्या मांडीवर झोपून हुंदके देत म्हणाला , '' देवा , देवा माझ्या काऊचे कष्ट मला दे. तिला सोडव. ''



माझ्या पतीपीडित भगिनींनो आणि मातांनो , काऊची अवस्था त्या वेळी किती केविलवाणी झाली असेल , याची कल्पना फक्त तुम्हालाच करता येईल.

नवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो. मध्यमवय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने , थोडे वैफल्याने , थोडे वैतागून सांगत होत्या , '' माझे मिस्टर म्हणजे कातिर्कस्वामीच. आठवड्यातले चार दिवस उपास. पुन्हा एकादशी , संकष्टी वेगळीच. सोमवारी शिवलीलामृत , गुरुवारी गुरुलीलामृत , शनिवारी शनिमाहात्म्य. तास न् तास पारायणे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकान्त मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले , तर दूर होऊन म्हणाले , ' अगं , आज माझी एकादशी आहे. ' आम्ही हनिमूनला जायचे ठरवले , तर म्हणाले , ' आपण सोलापूरला जाऊ. तेथून गाणगापूर , तुळजापूर , पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. ' प्रवासातही ते हनुमान चालिसा , शिवस्तुती , दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोहोचल्यावर हे लगेचच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते , तेवढ्यात यांनी बाथरूमचे दार उघडले आणि ' सॉरी , सॉरी ' म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले , ' झाले का ग तुझे ?''

तशी वर्षाताईंना तीन मुले आहेत , पण सांगताना त्या म्हणतात , '' मला चार मुले आहेत. हा सगळ्यांत मोठा. ''

आळशी नवरेही बायकांना फार त्रासदायक वाटतात. बरेचसे नवरे रोज दाढी करत नाहीत. केली तर जमिनीवर आरसा ठेवून , मांडी घालून अर्धा-अर्धा तास दाढी करीत बसतात. साबणाचा फेस लावलेल्या भयानक चेहऱ्याने मध्येच पेपर वाचतात. मधूनच गाल खरडतात. तो साबणाचा फेस वाटीतच बुडवून ठेवतात. नंतर ती वाटी तशीच ठेवून सरळ आंघोळीला जातात.

सारख्या जांभया देणे , जांभया देत बोलणे , प्रचंड मोठी ढेकर देणे ,घोरनारे, सारखे आडवे होऊन झोपणे असे वागणारे नवरे काय भयंकर पीडाकारक असतात , ते समजण्यासाठी त्यांच्या बायकांच्या जन्मालाच जावे लागेल. कोणताही पीडाहारी झंडू बाम त्यांच्या डोकेदुखीला उपयोगी ठरत नाही.

एक नवरा सारखा झोपून राहायचा. त्याचा तापट मुलगा सारखा आरडाओरडा करायचा. एकदा त्याची झोपमोड झाली म्हणून तो रागावला , तर बायको म्हणाली , '' झोपलेल्या बैलापेक्षा भुंकणारा कुत्रा थोडा तरी कामाचा असतो. ''

नवऱ्यांचा , बायकी चौकशा करण्याचा स्वभाव तर बायकांचा रक्तदाब हमखास वाढवतो. एक इसम , बायकोच्या मैत्रिणी आल्या की , सरळ त्यांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. भयंकर नाजुक-नाजुक बोलायचा. एकदा बायकोच्या मैत्रिणीला म्हणाला , '' वहिनी , साडी नवी वाटतं ?'' ती म्हणाली , '' छे हो , जुनीच आहे. '' परत तो म्हणतो , '' नाही , अंगावर कधी दिसली नाही , म्हणून विचारले हो सहज. '' तेव्हापासून ती बाई अंगभर पदर घेऊ लागली.

सारखी सिगरेट फुंकणारे किंवा तोंडात तंबाखू विरघळल्यामुळे लाळ सुटलेली असतानाही वर तोंड करून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारे नवरे बायकांना भयानक उपदवी वाटतात. काही नवरे येता-जाता आरशात बघून केस सारखे करतात , पावडर लावतात , वळून-वळून सगळ्या अँगल्सनी आरशात बघतात , हे तर बायकांना चीड आणते.
स्वयंपाकघरात मदत करतो असे सांगून काहीबाही तोंडात टाकत राहणारे नवरेही बायकांना असह्य वाटतात.

बायकोकडे सारखी मेहुणीची चौकशी करणे , सासूबद्दल विचारणा करणे , बायकोच्या मैत्रिणींच्या स्मार्टपणाचे कौतुक करणे , तिच्या वडिलांच्या इन्कमची चौकशी करणे , ' मीपण बिझिनेस करावा असे म्हणतोय ' असे नुसते म्हणत वर्षानुवषेर् पोस्टात नोकरी करीत राहाणे , अशा नवऱ्यांचा बायकांना फार संताप येतो.

कुठल्याही क्षणी लादेन येईल आणि बॉम्बस्फोट करेल अशा चेहऱ्याने वावरणारेही काही नवरे असतात. भयरसाचा अतिरेक झाल्यामुळे हास्यरस लोप पावलेला असतो. असे नवरे क्वचित हसले , तर त्यांच्या बायकांना बंपर लॉटरी लागल्यासारखे वाटते. हे सारखे काळजीत असतात. जरा दुखले , खुपले की , त्यांना भयंकर रोग झाल्याच्या भावना होऊ लागतात. बायको ' डॉक्टरांकडे जाऊ या ' म्हणाली , तर टेस्ट करून घ्यायलाही घाबरतात. अशा नवऱ्यांच्या बायकांना कायमची सदेह साडेसाती असते. असे नवरे बायकोचा कोणी अपमान केला , तरी तिचीच समजूत काढतात , '' जाऊ दे ग , तू लक्षच देऊ नकोस. ''

गुळगुळीत दाढी केलेल्या , गोल बायकी चेहऱ्याचे , काळ्याभोर डोळ्यांचे , हळुवार आवाजात गोड-गोड बोलणारे , नाजुक-नाजुक हसणारे , लाजरे-बुजरे पुरुष तर बायकांच्या डोक्यात जातात. काही पुरुष तर बहिरे असल्यासारखे दिसतात. पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. बायको काही बोलली की , पेपरमधले डोकं वर काढतात , अतिशय निविर्कारपणे तिच्याकडे पाहातात , पुन्हा पेपरमध्ये डोके घालतात.

नवऱ्यांच्या जेवणाचे प्रकारही विचित्र असतात. काही नवरे भुरके मारतात की बोंब मारतात , तेच तिला कळत नाही. मध्येच अ आ इ ई ची बाराखडी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ ढेकर देतात. काही नुसते खातच राहतात. बायकोने सहज विचारले , '' खीर आवडली का हो ?'' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का ?'' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात , '' अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का ?'' काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा ?'' आणि बायकांना संतापजनक वाटणारे नवरे म्हणजे अर्धा-अर्धा तास भात चिवडत बसून मिचिमिची जेवणारे आणि चप् चप् असा आवाज करणारे नवरे...

... बायकांना खूप-खूप आवडणाऱ्या एका तरी परिपूर्ण नवऱ्याची पत्रिका पाहाण्याचा योग माझ्या पत्रिकेत आहे का , याचा सध्या मी अभ्यास करीत आहे.

- शरद उपाध्ये

आता जाऊ द्या ना..funny talk

सावे- मे आय कम इन सर?
बॉस- येस, कम इन.
सावे- सर, थोडा उशीर झाला सर.
बॉस- थोडा म्हणजे किती?
सावे- अर्धा तास.
बॉस- आणि जास्त म्हणजे किती हो?
सावे- ..
बॉस- उशीर का झाला?
सावे- सर, गाडय़ा लेट होत्या.
बॉस- तुमच्याच कॉलनीत राहणारा भावे  वेळेवर कसा आला मग?
सावे- सर, तो लवकर निघतो.
बॉस- म्हणजे तुम्ही उशिरा निघता?
सावे- नाही सर, पण..
बॉस- पण काय?
सावे- त्याचं काय आहे सर, आमच्याकडे पाणी सकाळी येतं ना!
बॉस- किती वाजता?
सावे- पाच वाजता.
बॉस- मग?
सावे- सर, पाणी मलाच भरावं लागतं.
बॉस- भावे पाणी भरत नाही का?
सावे- माहीत नाही सर. पण तो कपडे धुतो..
बॉस- तुम्हाला कसं कळलं?
सावे- तो रोज कपडे पिळून गॅलरीत सुकायला टाकत असतो सर.
बॉस- त्यांची गॅलरी तुमच्या फ्लॅटमधून दिसते का?
सावे- होय सर.
बॉस- आणि तुमचं किचन त्यांच्या बेडरूममधून दिसतं?
सावे- बरोबर सर, पण तुम्हाला कसं माहीत सर?
बॉस- ते महत्त्वाचं नाही, पण तुम्ही अनेक वेळा स्वैपाक करताना, भांडी घासताना दिसता.
सावे- तशी मिसेसला स्वैपाकात थोडी मदत करतो सर.
बॉस- काय मदत करता?
सावे- हेच सर, भाजी चिरून देणं, तांदूळ निवडून देणं, कधी कधी तिचे हात दुखत असतात मग पीठही मळून द्यावं लागतं.
बॉस- हात दुखत असतील तर त्या चपात्या कशा लाटतात?
सावे- नाही सर.. म्हणून बऱ्याच वेळा मलाच चपात्या लाटाव्या लागतात.
बॉस- म्हणजे तुम्हाला स्वैपाक करावा लागतो?
सावे- नाही सर स्वैपाक तीच करते.
बॉस- तुम्हीच तर सर्व करता, मग मिसेस काय करतात?
सावे- सर, तांदूळ निवडून दिले की ती भात कुकरला लावते, भाजी चिरून दिली की ती फोडणीला घालते, पीठ मळून दिले की..
बॉस- अच्छा, म्हणजे ती तुम्हाला मदत करते!
सावे- हो सर. आम्ही एकमेकांना मदत करतो सर. पण भावेइतकं मला अजून जमत नाही सर.
बॉस- काय?
सावे- हेच सर.. लेडीज ड्रेसना इस्त्री करणे, डोक्याला मेंदी लावणे.
बॉस- भावे हेच म्हणत होते.
सावे- काय?
बॉस- तुमच्या काही गोष्टी त्यांना अजून जमत नाहीत म्हणून.
सावे- म्हणजे?
बॉस- म्हणजे तुम्ही चांगलं हेड मसाज करता म्हणे.
सावे- हो ना सर, भावेच्या डोक्यावर केस होते तेव्हा त्यांना केलं होतं मसाज.
बॉस- म्हणजे आता तुमच्या कलागुणांचा तसा मलाही काही उपयोग नाही.
सावे- हो ना, बरोबर ओळखलंत सर. हेच तर तुमच्यात आणि भावेमध्ये साम्य आहे.आणि त्यामुळेच तुम्ही दोघेही वेळेवर येऊ शकता आणि मला थोडा उशीर झालाय सर. सॉरी, आता जाऊ द्या ना..
बॉस- जा!