Friday, March 16, 2012

तेंडुलकरणे मारलेले शतक हे कितेक जणांना आनंद देऊन गेल असेल

तेंडुलकरणे मारलेले शतक हे कितेक जणांना आनंद देऊन गेल असेल यासाठी त्याच अभिनंदन आणि धन्यवाद ! पण आज त्याची प्रत्येक चौकावर आणि नाक्यावर चर्चा असेल,
आता कितेक वर्तमानपत्रे , न्यूजचानलवाले आणि आपण सर्व या विषयावर गपांचा आणि बातम्यांचा रतीब हाणून पाडू. परंतु हे करत असताना तुमच्या आणि माझ्यातले सर्वजण मात्र स्वताच अस्तित्व मात्र हरवून जातील. कारण आपलं जग हे आपलं कुटुंब आहे आणि  आपण त्यावर मात्र  बोलणार नाही, माझ्या घरात आजारी असणाऱ्या माझ्या आईला विचारणारही नाही कि  आई तुझी तबेत कशी आहे,  तुमची वाट पाहत असलेला तुमचा मुलगा तसाच झोपून गेला याच शल्य तुम्हाला वाटणार नाही, फेसबुक वर तुम्हाला न ओळखणाऱ्या तेंडुलक्र्च्या अभिनंदना ने तुम्ही तुमच्या wall भराल पण आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला विश करायला दहावेळा विचार कराल. नाकोत्या गोष्ठींची सांगड घालण्यातच आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो.  आपण जर डोळे नीट उघडे ठेऊन आजूबाजूला पाहिलं तर खर सुख हे आपल्या आजूबाजूला असतं पण आपल्याला ते कधी उमगतच नाही कारण आम्ही फक्त अशा गोष्ठींच्या पाठीमागे असतो ज्या फक्त मृगजलाप्रमाणे आभास देऊन जातात ...आणि जेव्हा हा आभास होतो तेव्हा आम्ही आयुषातले अनंत अंतर कापलेले असते...आणि मग आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कळतो पण वेळ निघून गेलेली असते ...म्हणून जगताना सुखात जागा ......सुखाप्रमाणे जगू नका  कारण तो  फक्त आभास आहे आभास !

भूषण पाटील

Thursday, March 15, 2012

घडताना मी कसा घडलो

घडताना मी कसा घडलो याच भान मला नाही.आणि जेव्हा मी भानावर आलो मी घडून गेलो होतो म्हणजे याचा अर्थ असा नवे कि मी माझं भान हरपून बसलो होतो कारण मी घडत असताना माझं लक्ष्य हे आजूबाजूच्या लोकांच्या घड्ण्यावर होत आणि ते घडत असताना मी त्यांच्यातूनच त्यांच्या चांगल्या वाईट गुण दुर्गुणांचा स्वीकार करत होतो....आणि आता मी हा असा तुमच्या समोर उभा आहे.
भूषण पाटील 

जेव्हा तुमच्यावर टीका होते

जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही वेडे असता आणि जेव्हा तुमची स्तुती होते तेव्हाहि तुम्ही वेडे असता
आणि अस जर आपण राहिलो तर निंदक आणि स्तुतिपाठक मात्र नक्कीच वेडे होतात आणि हेच लक्षण आहे तुमच्या शहाणे असण्याच
भूषण पाटील